आपल्याला पुढच्या महिन्यात किती खर्च येणार आहे, त्यात आवश्यक किती, अनावश्यक किती, कोणता खर्च टाळता येऊ शकतो, कोणता कमी करता येऊ शकतो, त्यात कुठे पसे वाचवण्याची संधी आहे का वगरेची आखणी म्हणजे आíथक नियोजन. हे नियोजन व्यक्तिसापेक्ष असते. या नियोजनालाच देशाच्या परिमाणात अर्थसंकल्प म्हणतात. अर्थसंकल्प त्या त्या देशाच्या वकुबानुसार असतो. अर्थसंकल्प मंजूर करून घेण्याची त्या त्या देशाची आपली म्हणून एक अशी व्यवस्था असते. तिला मंजुरी मिळाल्यानंतर त्या त्या देशाचा आर्थिक गाडा सुरळीत चालतो. जगाला व्यापून टाकणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेबाबत नेमकं हेच घडत नाहीय. त्यामुळेच तेथे अर्थसंकल्पाच्या मंजुरीवरून निर्माण झालेली कोंडी जागतिक अर्थव्यवस्थेला हुडहुडी भरवणारी आहे. काय आहे ही कोंडी..
संकटकारण.. आपल्याकडचे आर्थिक वर्ष सुरू होते १ एप्रिलला आणि संपते ३१ मार्चला. त्यामुळे रीतिरिवाजानुसार आपल्या संसदेत देशाचा अर्थसंकल्प २८ फेब्रुवारीला मांडला जातो. त्यावर मग चर्चा होते. दुरुस्त्या सुचवल्या जातात आणि अखेरीस ३१ मार्चच्या आत त्याला मंजुरी मिळते. संसदेच्या दोन्ही सभागृहांत म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही ठिकाणी अर्थसंकल्पाला मंजुरी मिळवावी लागते. त्यानंतर मग त्यातील अनेक तरतुदींची अंमलबजावणी होते. या अर्थसंकल्पात सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांसाठीच्या खर्चाचीही तरतूद असते.
शटडाऊन म्हणजे काय?
अर्थसंकल्पच मंजूर न झाल्याने विविध सरकारी खात्यांना मंजूर होणारा निधी आटतो. त्यांना खर्च करण्यासाठी आíथक स्रोतच राहत नाही. त्यामुळे अशा अवस्थेत सर्व कामकाज ठप्प पडण्याचाच धोका जास्त असतो. यालाच शटडाऊन असे म्हणतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा