U S TikTok Ban News: शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या टिकटॉक ॲपवर अनेक देश बंदी घालत आहेत. भारताने देखील २०२० मध्ये टिकटॉक (TikTok) ॲपसह इतर ५९ चीनी ॲपवर बंदी घातलेली आहे. जगातील अनेक देश टिकटॉकवर बंदी घालत आहेत. अमेरिकेत देखील टिकटॉकवर बंदी घालण्यात आलेली आहे. अमेरिकेत टिकटॉकवरील बंदीनंतर हे प्रकरण थेट अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं. दरम्यान, आता अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने टिकटॉक ॲपवरील बंदीसंदर्भात महत्वाचा निर्णय दिला आहे. अमेरिकेतील टिकटॉक ॲपवरील बंदी हटवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
युनायटेड स्टेट्सच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉक ॲपच्या विरोधात निकाल दिला. तसेच तेथील फेडरल कायदा कायम ठेवला. त्यामुळे टिकटॉक ॲप कंपनीसाठी हा मानला जात आहे. टिकटॉक ॲप हे चिनी कंपनी बाइटडान्सच्या (ByteDance) मालकीचं असलेलं शॉर्ट-फॉरमॅट व्हिडीओ ॲप आहे. टिकटॉकवर राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव अनेक देशात बंदी घालण्यात आलेली आहे. आता अमेरिकेतही टिकटॉक ॲपवर बंदी कायम करण्यात आल्यामुळे टिकटॉक ॲपच्या वापरकर्त्यांसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. यासंदर्भातील वृत्त रॉयटर्सच्या हवाल्याने इंडिया टुडेनी दिलं आहे.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सरकारने मंजूर केलेला कायदा कायम ठेवला. त्यामुळे आता कायद्यानुसार चिनी मूळ कंपनी चिनी कंपनी बाइटडान्सच्या (ByteDance) टिकटॉकला अमेरिकेत बंदी कायम असणार आहे. जर नियमाचं उल्लंघन केलं तर कारवाईला सामोर जावं लागणार आहे. अमेरिकेत आजही अनेक लोक हे अॅप वापरत असल्याचा दावा केला जात होता. मात्र, आता पूर्णपणे बंदी असणार आहे. मात्र, जर टिकटॉक हे अॅप चिनी मालकीपासून वेगळे झाल्यास सुरु राहू शकतं, अशी शक्यताही व्यक्त करण्यात आली असल्याचंही वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, आता अमेरिकेत टिकटॉकचे भवितव्य हे आता निर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प हे आधी राष्ट्राध्यक्ष असताना टिकटॉकच्या बंदीचं समर्थन केलं होतं. मात्र, त्यानंतर त्यांनी या प्रकरणावर भूमिका बदलली होती. त्यामुळे आता निर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका देखील महत्वाची ठरणार आहे.