नवी दिल्ली : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेच्या संवर्धनासाठीही केंद्र सरकारच्या अनुदानासह सर्व लाभ देण्याची विनंती राज्य सरकारने बुधवारी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला केली. या संदर्भातील केंद्राला ८-१० दिवसांत प्रस्ताव सादर केला जाईल, अशी माहिती मराठी भाषा व उद्याोगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

मंत्री सामंत यांच्यासह साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक-अभ्यासक सदानंद मोरे, अभिजात भाषा पाठपुरावा समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मुळे, ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप ढवळ व राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक शामकांत देवरे यांनी दिल्लीत बुधवारी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेतली. मराठीला ३ ऑक्टोबर २०२४ रोजी अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती व त्यासंदर्भातील अधिसूचना ४ ऑक्टोबर रोजी काढण्यात आली.

Ajit Pawar discussion with Amit Shah in Delhi
अजित पवारांची दिल्लीत अमित शहांशी चर्चा
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
वृद्धाश्रमासाठी फक्त एक एकर जागा; उद्याोगमंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
Tirupati stampede
Tirupati stampede : तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी, सहा भाविकांचा मृत्यू
supreme Court
Supreme Court : वयाच्या १४ वर्षी केलेल्या गुन्ह्यात व्यक्तीची २९ वर्षांनंतर सुटका; सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश, नेमकं प्रकरण काय?
Parliamentary committee meeting opposition aggressive on one nation one election issue
संसदीय समितीची वादळी बैठक ,‘एक देश एक निवडणूक’ मुद्द्यावर विरोधक आक्रमक
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Chief Minister Devendra Fadnavis announcement regarding land registration Mumbai news
कोणत्याही कार्यालयातून दस्तनोंदणीची मुभा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

हेही वाचा >>>अटकपूर्व जामिनाच्या मागणीसाठी सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश उच्च न्यायालयात

केंद्राने अधिसूचना काढल्यामुळे अभिजात भाषेच्या संवर्धनासाठी केंद्राचे आर्थिक साह्य मराठी भाषेसाठीही मिळू शकते. अभिजात भाषांच्या संवर्धनासाठी केंद्र सरकार दरवर्षी २५० ते ३०० कोटी रुपयांचे अनुदान देते. त्यातील निधीचा वाटा मराठी भाषेसाठी उपलब्ध होऊ शकतो. मराठी ग्रंथ व साहित्याचा प्रचार, ग्रंथालये उभारणे, मराठी भाषेच्या प्रचारासाठी भाषा भवनाची उभारणी करणे आदी विविध कामांसाठी केंद्राच्या अनुदानाचा योग्य वापर करता येऊ शकतो. त्यासंदर्भात राज्य सरकारकडून प्रस्ताव दिला जाणार आहे.

अधिसूचना ४ ऑक्टोबरचीच

● ‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे मराठी भाषकांचे स्वप्न आज अधिकृतपणे पूर्ण झाले’, असेही सामंत पत्रकार परिषदेत म्हणाले. वास्तविक हे स्वप्न ४ ऑक्टोबर २०२४ रोजीच पूर्ण झाल्याचेे उघड होत आहे.

● केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाने ३ ऑक्टोबर रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे ४ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यासंदर्भातील अधिसूचनाही काढली. त्यामुळे मराठी भाषेला अधिकृतपणे अभिजात भाषेचा दर्जा तीन महिन्यांपूर्वीच मिळाला आहे. तरीही, ‘अधिसूचना काढण्यासंदर्भात शेखावत यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर शेखावत यांनी अधिकृतपणे अधिसूचना आज महाराष्ट्राच्या जनतेकडे सुपूर्द केली’, असा दावा सामंत यांनी केला.

● मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे औपचारिक आभार मानण्यासाठी खरेतर सामंत यांनी शेखावत यांची भेट घेतली होती. त्याच औपचारिकतेतून शेखावत यांनी बुधवारी अधिसूचनेची प्रत सामंत यांना सुपूर्द केली. मात्र त्यातून अधिसूचना बुधवारी (८ जानेवारी) काढली गेल्याचा भास निर्माण झाला.

साहित्य संमेलनासाठी दोन कोटींचा निधी

पुण्यामध्ये ३१ जानेवारी, १ व २ फेब्रुवारी असे तीन दिवस विश्व मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाच्या उद्घाटनाला केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत उपस्थित राहणार आहेत. तर राजधानी दिल्लीमध्ये २१ ते २३ फेब्रुवारी या काळात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असून, त्यासाठी २ कोटींचा निधी उपलब्ध करून दिल जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.

Story img Loader