शेतकऱ्यांबाबत मी जी भूमिका मांडली होती, ते भाजपाने ऐकलं मग युती का करू नको? शरद पवारांना टीका करायला काय जातं आहे? मला सांगत आहेत की मी टीका केली. मी जे काही बोललो ते मला मान्य आहेच. मला तुम्ही शिकवू नका, राष्ट्रवादीसारखी शेण खाणारी अवलाद आमची नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. परभणीमध्ये उद्धव ठाकरेंनी सभा घेतली. लाज वाटते का? हा प्रश्न आम्हाला विचारत आहात. हा प्रश्न कोण प्रश्न कोण विचारतंय तर घोटाळेबाज आणि दरोडेखोर. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये दरोडेखोर आणि घोटाळेबाज आहेत ते आम्हाला विचारणार का लाज वाटते का? हा प्रश्न विचारताना तुम्हाला लाज वाटते का? असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शरद पवार आणि राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
संकटाच्या काळी हाक मारल्यावर तुमच्या हाकेला ओ देतो तो शिवसैनिक त्याला निवडून देण्यासाठीच ही निवडणूक आहे. मोदींना प्रचंड मतांनी निवडून द्या असं म्हणत उद्धव ठाकरेंनी निशाणा विरोधकांवर तिखट शब्दात साधला आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसने ‘लाज वाटते का?’ असा प्रश्न विचारत ट्विटरवर एक मोहीम सुरू केली आहे. हा प्रश्न अर्थातच विद्यमान सरकारला विचारला जातो आहे. याच घोषणेचा उद्धव ठाकरेंनी पुरेपूर समाचार घेतला आहे. शरद पवार मला माझ्याच वाक्यांची आठवण करून देत आहेत. मी ते बोललो नाही असे म्हटलेलेच नाही. मात्र ज्यांच्या पक्षात दरोडेखोर आहेत असे लोक मला जाब कसा काय विचारत आहेत? राहुल गांधींच्या पक्षात घोटाळेबाज आहेत आणि राष्ट्रवादीत दरोडेखोर आहेत असाही आरोप उद्धव ठाकरेंनी केला.