नुकत्याच संपलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर व देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंवर टीका केली. आपल्या भाषणात मोदींनी ते स्वत: ओबीसी असल्याचाही उल्लेख केला. विरोधी पक्षांनी यावरून मोदींना लक्ष्य केलं आहे. मोदी आख्ख्या देशाचे पंतप्रधान असून त्यांनी स्वत:ला एक जात लावून घेणं योग्य नाही, अशी भूमिका विरोधी पक्षांकडून मांडण्यात आली आहे. आता ठाकरे गटाकडून मोदींच्या याच कृतीवरून त्यांची तुलना थेट देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी केली आहे.

“राजकारणात एखाद्याकडे सांगण्यासारखे फार काही नसले की तो स्वतःच्या जातीवर येतो. स्वतःची जात काढतो. जातीबाबत हातघाईवर येतो. पंतप्रधान मोदी यांनी तेच केले आहे. पंतप्रधान स्वतःची जात वगैरे सांगून रडायला लागतो व त्यावर मते मागतो तेव्हा बेशक समजावे, या पंतप्रधानाने जनतेसाठी व देशासाठी काहीच केलेले नाही व जात हाच त्याचा मुख्य आधार आहे”, अशा शब्दांत सामना अग्रलेखातून पंतप्रधानांना लक्ष्य करण्यात आलं आहे.

PM Narendra Modi Speech
JKF’S Forgotten Crisis हे पुस्तक विरोधकांनी वाचावं, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी का दिला? नेहरुंबाबत काय दावे आहेत?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
veteran actor amol palekar remark in jaipur literature festival 2025
जयपूर साहित्य महोत्सव :सध्या सरकारविरोधात जो बोलतो तो देशद्रोही; अमोल पालेकर यांचे परखड मत
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Uddhav Thackeray Speech News
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं अमित शाह यांना जोरदार प्रत्युत्तर, “जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा…”

“मोदी हे नकली ओबीसी आहेत, त्यांचा…”

“मोदी हे स्वतः ‘ओबीसी’ असल्याचे सांगतात. पण ही त्यांची थापेबाजी असून ते देशाला फसवत आहेत, असे राहुल गांधी यांनी पुराव्यासह समोर आणले. मोदी हे नकली ओबीसी आहेत. मोदी यांचा जन्म मोढ घांची जातीत झाला. उत्तरेत ही जात ‘तेली’ म्हणून ओळखली जाते. गुजरातमध्ये ही जात आधी ओबीसी प्रवर्गात समाविष्ट नव्हती. केंद्रात भाजपचे राज्य आल्यावर त्यांनी आपल्या मोढ घांची जातीचा समावेश ‘ओबीसी’त केला. मोदी गुजरातच्या सधन व समृद्ध जातीत जन्मास आले व राजकीय लाभासाठी त्यांनी स्वतःची जात ‘ओबीसी’त घातली”, अशा शब्दांत ठाकरे गटानं मोदींचा दावा खोडून काढला आहे.

“आइन्स्टाइन तेव्हा १०० टक्के खरं बोलले”

“१९४९ साली नेहरू अमेरिकेत आइन्स्टाइन यांना भेटल्यानंतर म्हणाले, ‘सर, आपण जीनियस आणि महान आहात’. यावर आइन्स्टाइन म्हणाले, ‘कोण किती महान हे २१ व्या शतकात कळेल.’ त्या भेटीच्या ७० व्या वर्षानंतर प्रत्येक भारतीय नागरिकाला समजले की, आइन्स्टाइन शंभर टक्के खरे बोलले होते. कारण आजही देशाचा स्वयंघोषित ओबीसी प्रधान सेवक आपल्या प्रत्येक अपराधातून मुक्ती मिळवण्यासाठी देशाच्या पहिल्या कर्तबगार प्रथम सेवकास शरण जातो”, असा टोलाही ठाकरे गटानं पंतप्रधान मोदींना लगावला आहे.

Video: ‘पंतप्रधान मोदी ‘ओबीसी’ म्हणून जन्मले नाहीत’, राहुल गांधींनी थेट जातीचा केला उल्लेख

“स्वतःच्या जातीचा प्रचार करून राजकारण करण्याची वेळ नेहरूंवर आली नाही. आपल्या स्वार्थासाठी इतिहासाच्या फालतू खोदकामांत त्यांनी वेळ घालवला नाही. त्यांनी लोकांना देश घडविण्याच्या कामी लावले. थाळ्या-टाळ्या, अक्षता, व्रत-वैकल्यांत त्यांनी लोकांना गुंगवून ठेवले नाही. धर्माच्या अफूची गोळी व जातीचा गांजा त्यांनी लोकांना दिला नाही. त्यांनी ज्ञान-विज्ञानाचा मंत्र चिरंजीव केला. त्यामुळे वारंवार स्वतःच्या जातीचा उद्धार करण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. मोदी हे जातीत रमतात! त्यामुळे आइन्स्टाइन त्यांना कधीच भेटणार नाहीत”, अशी टिप्पणी ठाकरे गटानं केली आहे.

“जी व्यक्ती आपल्या मृत्यूनंतर ५६ वर्षांनंतरही ५६ इंच छाती असणाऱ्या पंतप्रधानांना सकाळ, संध्याकाळ, रात्री सलग आठवते ती व्यक्ती खरोखरच किती महान असेल?” असा खोचक सवालही ठाकरे गटानं विचारला आहे.

Story img Loader