राजधानी दिल्लीत नुकतीच जी २० शिखर परिषद संपन्न झाली. या परिषदेत जगभरातील प्रभावी देशांचे राष्ट्रप्रमुख सहभागी झाले होते. रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात एकमताने ठराव संमत होणं हे या परिषदेचं सर्वात मोठं यश मानलं जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून परिषद यशस्वी झाल्याचं जाहीर करण्यात आलं. मात्र, या परिषदेच्या निमित्ताने ठाकरे गटाने केंद्र सरकारवर परखड शब्दांत हल्लाबोल केला आहे. देशांतर्गत समस्यांवर अद्याप तोडगा नसेल, तर मोदींनी जग जिंकून काय फायदा? असा सवाल ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे.

“आपल्या देशात काय जळतंय ते आधी…”

पंतप्रधानांनी सर्व परदेशी पाहुण्यांना रात्रीचे जेवण दिले. त्या ‘डिनर’साठी काँग्रेस अध्यक्ष तसेच विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे सोडून सगळ्यांना बोलावले. एक प्रकारे ते भव्य अशा गावजेवणाचेच निमंत्रण होते. राज्यांचे मुख्यमंत्री त्यात सहभागी होते. जेवण झाल्यावर शिंदे यांनी ढेकर दिला की, “पंतप्रधान मोदींनी जग जिंकले.” पण मोदी जग जिंकत असताना देशात मणिपूर आजही पेटलेले आहे व मणिपूरच्या जनतेची मने मोदी जिंकू शकलेले नाहीत. चीनने लडाखची जमीन गिळली आहे व त्या जमिनीवरून मोदी चिन्यांना मागे ढकलू शकलेले नाहीत. तेव्हा जग जिंकत असताना आपल्या देशात काय जळते ते आधी पाहणे गरजेचे आहे”, अशा शब्दांत सामना अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्यात आलं आहे.

Uddhav Thackeray On Amit Shah
Uddhav Thackeray : “जरा डोक्याला ब्राह्मी तेल लावा, मग…”, उद्धव ठाकरेंची अमित शाह यांच्यावर बोचरी टीका
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
raj thackeray latest news
काँग्रेसबरोबर युती करण्यावरून राज ठाकरेंची पुन्हा उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले, “मी, माझा स्वार्थ, माझी खुर्ची अन्…”
uddhav Thackeray sawantwadi
“कोकण आणि शिवसेनेचे नाते तोडण्याचा प्रयत्न, कोकणचे अदानीकरण होऊ देणार नाही”, उद्धव ठाकरेंचा इशारा
Uddhav Thackeray Speech in Ausa Latur
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची खोचक शब्दांत टीका, “महायुतीला मत म्हणजे गुजरातला मत, कारण..”
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
Narendra modi Rahul Gandhi Bal Thackeray
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं मविआ नेत्यांना आव्हान; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले, “राहुल गांधींकडून…”
Uddhav Thackeray Raj Thackeray
“राज ठाकरे भाषण करून गेले तिथे अडरवर्ल्डच्या मदतीने…”, ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप; म्हणाले, “अनेक मतदारसंघांत गुंडांच्या टोळ्यांना…”

“युक्रेनइतकीच मणिपूरची मनुष्यहानी महत्त्वाची”

“दिल्लीच्या घोषणापत्रात युक्रेन युद्धात झालेल्या मानवी हानीबद्दल आणि युद्धामुळे जगावर होणाऱया दुष्परिणामांबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली, पण अशाच प्रकारची मनुष्यहानी स्वदेशात मणिपुरात सुरू आहे. हजारो लोक बेघर झाले आहेत, पाचशेच्या आसपास लोक मरण पावले आहेत. युक्रेनच्या मनुष्यहानीइतकीच मणिपूरची मनुष्यहानी महत्त्वाची आहे”, अशी टिप्पणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

जालना आंदोलकांवरील गुन्हे मागे, ३ पोलीस अधिकारी निलंबित, मुख्यमंत्र्यांची माहिती

“लोकशाही हा ‘जी-20’चा आत्मा आहे. महात्मा गांधी हे लोकशाहीचे जनक आहेत. ‘जी-20’ परिषदेसाठी भारतात आलेल्या राष्ट्रप्रमुखांनी पंतप्रधान मोदींसमवेत राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. हा भाजपवर व त्यांच्या सरकारवर काळाने घेतलेला सूड आहे. गेल्या दहा वर्षांत गांधी व गांधी विचार मारण्याचा प्रयत्न झाला, पण जगाला दाखविण्यासाठी का होईना, पंतप्रधान मोदी यांना गांधींसमोर झुकावे लागले. कारण जगाने गांधी विचार स्वीकारला आहे”, असा टोला ठाकरे गटानं लगावला आहे.

लालकिल्ला : ‘जी-२०’च्या लोकप्रियतेनंतर काय?

“मोदींनी दिल्लीत पंगत बसवली पण…”

भारत लोकशाहीची जननी असलेल्या पुस्तिकेचे वाटप या सोहळ्यात झाले. पण त्यातील लोकशाही म्हणजे निवडीचे स्वातंत्र्य या ओळीचे महत्त्वच उरलेले नाही. निवडणूक आयोगापासून न्यायव्यवस्थेपर्यंत हव्या त्या माणसांच्या नेमणुका करणे व त्यांच्या माध्यमातून राज्य करणे हे काही लोकशाहीतील संवादाचे लक्षण नाही. युक्रेनवरील हल्ला हा ‘जी-20’तील चिंतेचा विषय असेल, तर भारतातील लोकशाही व स्वातंत्र्याची गळचेपी हादेखील चिंतेचा विषय ठरला पाहिजे. नाहीतर दिल्लीत जग आले, मोदींनी पंगत बसवली, पण त्या पंगतीत भारताच्या लोकशाहीचे ताट रिकामे राहिले, असेच म्हणावे लागेल”, अशा शब्दांत ठाकरे गटानं मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.