पश्चिम बंगालबाबत भाजपाच्या नेत्यांना चिंता वाटते. चिंता वाटावी अशा अनेक घटना संपूर्ण देशात घडत आहेत. केंद्रीय बळ वापरूनही, दंगली पेटवूनही भाजपाचा पराभव होतो, हे पश्चिम बंगालच्या पंचायत निवडणुकांनी दाखवून दिले. भाजपाची खरी चिंता हीच आहे. लोक शहाणपणाने वागले तर हुकूमशाहीचा पराभव सहज होतो. पश्चिम बंगालात ते दिसले. ममता बॅनर्जी बंगालचे युद्ध जिंकल्या, असे शिवसेनेनं ( ठाकरे गट ) ‘सामना’त म्हटलं आहे.

“साधारण ७४ हजार पंचायतींसाठी निवडणुका झाल्या. भाजप, तृणमूलमध्ये लढत झाली व या निवडणुका एखाद्या युद्धाप्रमाणे लढल्या गेल्या. या युद्धात ४० जणांचा मृत्यू झाला. अनेक मतदान केंद्रांवर हिंसाचार, रक्तपात, जाळपोळ, बुथ लुटण्यासारखे प्रकार घडले. पण ग्रामपंचायतींच्या ३५ हजार जागा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने जिंकल्या. भारतीय जनता पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजपने ९७२२ ग्रामपंचायती जिंकल्या. तथापि, एकाही जिल्हा परिषदेत ‘कमळ’ फुलले नाही,” असा टोलाही ठाकरे गटाने भाजपाला लगावला आहे.

attack on Prithvi deshmukh
धक्कादायक! ठाकरे गटाच्या आमदार पुत्रावर सशस्त्र हल्ला; कायदा व सुव्यवस्था…
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
hasan hasarallah death effect on india
हिजबुल प्रमुखाच्या हत्येनंतर संघर्ष पेटणार? भारतासह इतर देशांवर काय परिणाम होणार?
Prime Minister Narendra Modi clear opposition to war in his speech in the General Assembly
युद्धभूमी हे मानवतेचे यश नव्हे! आमसभेतील भाषणात पंतप्रधान मोदी यांचा पुन्हा युद्धाला स्पष्ट विरोध
Controversy over ministership in Shiv Sena
शिवसेनेतील मंत्रिपदाची रस्सीखेच चव्हाट्यावर
ujjwal nikam on akshay shinde encounter
“या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी नक्कीच होईल, कारण…”; अक्षय शिंदेच्या मृत्यूप्रकरणी उज्वल निकम यांची प्रतिक्रिया!
donald trump assassination attempt,
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा पुन्हा प्रयत्न? फ्लोरिडातील गोल्फ क्लबबाहेर गोळीबार; हल्लेखोर अटकेत!
s Jaishankar marathi news
अन्वयार्थ: …उर्वरित २५ टक्के सैन्यमाघारी कधी?

हेही वाचा : “आम्ही जर बोललो तर पळता भुई थोडी…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

“पश्चिम बंगालात हिंसाचार घडला म्हणून भाजपा…”

“पश्चिम बंगालमधील हिंसाचार निषेधार्ह आहे, मग मणिपुरातील हिंसाचारामागचे सत्यशोधन करण्यासाठी भाजपाचे ‘सत्यवादी’ अद्याप का गेले नाहीत? मणिपूरला कोणत्याही निवडणुका नाहीत तरी संपूर्ण राज्य पेटले आहे. त्यावर पंतप्रधान मोदी सोडाच, तर भाजपाचे एकही राष्ट्रीय पोपटलाल बोलायला तयार नाहीत. पश्चिम बंगालात हिंसाचार घडला म्हणून भाजपा छाती पिटून घेत आहे. पश्चिम बंगालातील हिंसाचारात तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्तेही मरण पावले. यावर भाजप काय बोलणार?” असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

हेही वाचा : VIDEO : “…अन् तेव्हा-तेव्हा एकनाथ शिंदे जन्माला येतील”, देवेंद्र फडणवीसांचं…

“दंगली भडकवून धर्मांधतेला खतपाणी घालून…”

“२०१९ साली पश्चिम बंगालातून भाजपाने लोकसभेच्या १८ जागा जिंकून ममता बॅनर्जी यांना हादरा दिला होता. पण, नंतरच्या विधानसभा निवडणुकांत ममतांनी तृणमूलचा गड राखला. पश्चिम बंगालातील जिंकलेल्या १८ जागांमुळे भाजपा त्यावेळी ३०० पार करू शकला. पण यावेळी भाजपा पश्चिम बंगालात मागचा आकडा गाठू शकणार नाही व २०२४ साली ते २०० पार तरी होतील काय? हाच प्रश्न आहे. दंगली भडकवून धर्मांधतेला खतपाणी घालून दोन निवडणुका जिंकल्या हे खरेच, पण आता ते शक्य नाही. आग लावणाऱ्यांना ती विझवायचीही अक्कल लागते. आपलाच देश, आपलेच राज्य राजकीय स्वार्थापोटी पेटवून मजा बघत राहायचे हे एखाद्या निर्घृण हुकूमशहालाच जमू शकते,” अशी टीका ठाकरे गटाने अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.