सीएए कायदा काहीही झालं तरीही मागे घेतला जाणार नाही. हा कायदा कुणाचंही नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी नाही तर नागरिकत्व देण्यासाठी केलेला कायदा आहे. मोदी सरकारची गॅरंटी ही आहे की हे सरकार जे वचन देतं ते पाळतं. त्यामुळे मी हे ठामपणे सांगतो आहे की कुठल्याही परिस्थितीत हा कायदा मागे घेतला जाणार नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी उद्धव ठाकरे आणि असदुद्दीन ओवैसी यांच्यावरही टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलं आहे अमित शाह यांनी ?

उद्धव ठाकरे असं म्हणतात की तुमचं अपयश झाकण्यासाठी तुम्ही हा कायदा आणला आहे. याबाबत विचारलं असता अमित शाह म्हणाले, “मी उद्धव ठाकरेंना विचारु इच्छितो, तुम्हाला हा कायदा हवा की नको हे स्पष्ट करा. उद्धव ठाकरे हे सांगू इच्छितात की कायदा नको? देशाच्या जनतेला आणि महाराष्ट्राच्या जनतेपुढे हे मी आव्हान देतो की त्यांनी हे स्पष्ट करावं की हिंदू, बौद्ध, जैन, ख्रिश्चन शरणार्थींना नागरिकत्व देणारा कायदा यायला नको. उद्धव ठाकरेंनी हे सांगावं. राजकारण करु नका, मी थेट उद्धव ठाकरेंना विचारतो आहे की त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करा. “

हे पण वाचा- “उद्धव ठाकरेंना माझं खुलं आव्हान आहे, त्यांनी महाराष्ट्राला सांगावं…”, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आक्रमक

उद्धव ठाकरे मुस्लिमांचं लांगुलचालन करत आहेत

“उद्धव ठाकरे मुस्लिमांचं लांगुलचालन करत आहेत. मतं मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे हे सगळं करत आहेत. सध्याच्या घडीला मतं मिळवण्यासाठी हे सगळं चाललं आहे. आमची पहिल्या दिवसापासून ही भूमिका आहे की देशाची फाळणी झाल्यानंतर जे लोक भारतात शरणार्थी म्हणून आले आहेत त्यांना नागरिकत्व मिळालं पाहिजे. ” असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

नागरिकत्व कायदा हिरावण्याचा हा कायदा नाही

“सीएए कायद्यात विविध तरतुदी आहेत. सहाव्या सूचीत जी क्षेत्रं आहेत तिथे सीएए लागू होणार नाही. कुणी तिथून अर्ज केला तरीही तिथून ते स्वीकारलं जाणार नाही. सीएए कायदा हा भारताचं नागरिकत्व देणारा कायदा आहे. कुणाचंही नागरिकत्व हिरावून घेण्याचा हा कायदा नाही. केरळ, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांना कायदा नाकारण्याचा अधिकार नाही. कारण संसदेचा तो अधिकार आहे. हा विषय केंद्राचा आहे. केंद्र आणि राज्यांचा विषय नाही.” असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray is doing politics of appeasement muslims amit shah serious allegation scj
Show comments