Shuffle Of Tamilnadu Cabinet Udhaynidhi DCM : तमिळनाडूच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात आले असून मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पूत्र आणि उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शनिवारी रात्री उशिरा याबाबत माहिती देण्यात आली. रविवारी दुपारी साडेतीन वाजता उपमुख्यंत्री पदाचा शपथविधी सोहळा होणार आहे. तर, दोन दिवसांपूर्वी तुरुंगातून सुटून आलेल्या सेंथिल बालाजी यांनाही मंत्रिमंडळात घेण्यात आले आहे. तमिळनाडूचे राज्यपाल आर. एन रवी यांनी राज्य सरकारच्या शिफारशींना मंजुरी दिली आहे.
सेंथिल बालाजी व्यतिरिक्त द्रमुकच्या तीन नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. डॉ. गोवी. चेझियान, थिरू आर. राजेंद्रन आणि थिरू एस.एम.नासर यांचा समावेश झाला आहे. सेंथिल बालाजी यांना गेल्यावर्षी जून महिन्यात सक्तवसुली संचालनालयाने अटक केली होती. यावर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांनी तामिळनाडूच्या मंत्रिमंडळाचा राजीनामादिला होता. महत्त्वाचं म्हणजे उदयनिधी सध्या तामिळनाडूचे युवक कल्याण आणि क्रीडा विकास मंत्री आहेत.
நம் பெருமைமிகு தமிழ்நாட்டின் துணை முதலமைச்சராக பணியாற்றுவதற்கான வாய்ப்பை நமக்கு அளித்த கழகத்தலைவர் – மாண்புமிகு முதலமைச்சர் @mkstalin அவர்களை, பொதுச்செயலாளர் – பொருளாளர் மற்றும் மாண்புமிகு அமைச்சர்களுடன் நேரில் சந்தித்து வாழ்த்து பெற்றோம்.
‘துணை முதலமைச்சர்’ என்பது பதவியல்ல,… pic.twitter.com/x7InLzXoNc— Udhay (@Udhaystalin) September 28, 2024
उदयनिधी हे अभिनेते आणि निर्माते असून ते २०२२ मध्ये पहिल्यांदाच आमदार बनले आहेत. पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर त्यांना पहिल्या टर्ममध्ये मंत्रिमंडळात संधी मिळाली. मंत्रिमंडळात त्यांना क्रीडा आणि युवा विकास मंत्री हे खातं मिळालं होतं. दोनच वर्षांत त्यांनी चांगली प्रगती साधली. लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी जोरदार प्रचार केला होता. लोकसभा निवडणुकीत उदयनिधी यांनी द्रविड मुन्नेत्र कझगम पक्षाचा चांगला प्रचार केला होता. लोकसभा निवडणुकीच्या विजयाचं श्रेय उदयनिधी यांनाही दिलं जातंय. त्याचंच बक्षिस म्हणून उदयनिधी यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्री पदाची माळ घालण्यात आली आहे. तामिळनाडूमध्ये २०२६ ला विधानसभेच्या निवडणुका आहेत. उदयनिधी यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्याकरता मंत्रिमडळात मोठे बदल करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
हेही वाचा >> दक्षिणेत भाजपचा मतटक्का वाढला, पण जागा तितक्याच… तामिळनाडूत मात्र स्टॅलिन एके स्टॅलिनच!
सनातन धर्मावरील भाष्यावरून आले होते चर्चेत
काही महिन्यांपूर्वी त्यांनी हिंदू धर्माविरोधात भाष्य केलं होतं. “सनातन धर्म हा समानता आणि सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. त्यामुळे अशा गोष्टींना विरोध करण्याऐवजी त्यांचं समूळ उच्चाटन करायला हवं. डास, डेंग्यू, मलेरिया आणि करोनासारख्या आजारांना विरोध करता येऊ शकत नाही. त्यांचं उच्चाटनच करायला हवं. त्याचप्रमाणे सनातन धर्माचंही उच्चाटन व्हायला हवं”, असं उदयनिधी स्टॅलिन म्हणाले होते.
© IE Online Media Services (P) Ltd