यूजीसी नेट परीक्षेमधील गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागलेले आहे. देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे. या परीक्षेतील गोंधळानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. तर या पेपर लीक प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. आता पेपरफुटीच्या प्रकरणात सीबीआय आपला अहवाल सादर करणार आहे. मात्र, या अहवालात पेपरफुटी प्रकरणातील पुराव्यांशी छेडछाड झाल्याचं म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पेपरफुटी प्रकरणासंदर्भातील अहवाल न्यायालयात सीबीआय सादर करणार असून यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत पेपर लीक प्रकरणाची फेरपरीक्षा आणि योग्य तपासाची मागणी करण्यात आलेली आहे. याआधी केंद्र सरकार नॅशनल टेस्टिंग एजन्सीने बुधवारी प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. आता सीबीआय देखील सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : ‘सीबीआय’वर केंद्र सरकारचेच नियंत्रण; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा; पश्चिम बंगाल सरकारची याचिका दाखलयोग्य

दरम्यान, यूजीसी नेट पेपर पेपरफुटीच्या प्रकरणात सीबीआयला तपासात असं आढळून आलं की, १८ जून रोजी लाखो उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. मात्र, त्यानंतर एका दिवसातच शिक्षण मंत्रालयाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यूजीसी नेट ही परीक्षा दोन सत्रात घेण्यात आली होती. यामध्ये पहिले सत्र सकाळी ९.३० ते १२.३० आणि दुसरे सत्र दुपारी ३ ते ६ असे होते. मात्र, या दरम्यान, काही टेलिग्राम चॅनेलवर गडबड झाल्याचं आढळून आलं. मॉर्फ केलेला स्क्रीनशॉट व्हायरल झाले होते.

टेलिग्राम चॅनेलवर परीक्षेसंदर्भातील स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर भारतीय सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरद्वारे यासंदर्भातील इनपुट १९ जून रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पाठवण्यात आले. त्यानंतर सरकारने परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर सीबीआयने हा तपास हाती घेतला होता.

आता सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारवर इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, सीबीआयला असे आढळून आले आहे की, प्रश्नपत्रिकेचा स्क्रीनशॉट परीक्षेपूर्वी उपलब्ध असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी त्यात फेरफार करण्यात आली होती. यूजीसी नेट परीक्षेच्या पहिल्या सत्रानंतर लगेचच दुपारच्या सुमारास एका उमेदवाराने टेलिग्राम चॅनलवर प्रश्नपत्रिकेचा फोटो शेअर केला होता. हे छायाचित्र अनेक लोकांकडे प्रसारित झाले होते. मुळात एका टेलीग्राम चॅनलद्वारे चालवलेला हा एक घोटाळा होता. ज्यामध्ये एकदा पेपरचे पहिले सत्र संपले की, घोटाळेबाजांनी त्या प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र काही विद्यार्थ्यामार्फत प्रसारित केले. हे सर्व विश्वासार्हता प्रस्थापित करण्यासाठी केले गेले. जेणेकरून ते भविष्यात या माध्यमातून पैसे कमवू शकतील, असं वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ugc net paper leak case cbi investigation revealed shocking information gkt