केंद्र सरकारच्या आधार कार्ड योजनेचे प्रमुख आणि इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांनी आज (रविवार) अधिकृतरित्या काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांना काँग्रेसने दक्षिण बंगळूरु मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
नीलेकणी दक्षिण बंगळूरु मतदार भाजपचे एच. एन. अनंतकुमार यांच्याविरोधात निवडणूक लढविणार आहेत. अनंतकुमार हे सलग पाचवेळा याठिकाणाहून निवडून आलेले आहेत. नीलेकणी यांनी यापूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते.

Story img Loader