पीटीआय, लंडन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्रिटनस्थित औषध उत्पादक कंपनी ॲस्ट्राझेन्काने करोनाच्या लशीचे जगभरातील साठे परत बोलाविले आहेत. भारतात ही लस ‘कोविशिल्ड’ या नावाने वितरित झाली होती. गेल्या आठवड्यात कंपनीने ब्रिटनमधील न्यायालयात या लशीच्या दुष्परिणामांबाबत कबुली दिली होती.

ॲस्ट्राझेन्काने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने कोविड-१९वरील ही लस विकसित केली आहे. भारतात सीरम इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ही लस वितरित झाली, तर युरोपमध्ये ‘वॅक्सझेर्विया’ या नावाने ही लस दिली गेली. गेल्या आठवड्यात या लशीमुळे रक्तात गुठळ्या होणे किंवा प्लेटलेट कमी होण्यासाठी दुष्परिणाम दुर्मीळ प्रमाणात आढळत असल्याची कबुली कंपनीने दिली होती. त्यानंतर युरोपियन मेडिसिन्स एजन्सीने मंगळवारी ‘वॅक्सझेर्विया’ लशीचा वापर अधिकृत नसल्याचे जाहीर केले. महासाथीनंतर अद्यायावत लशींची उपलब्धता जास्त असल्याचे कारण सांगत कंपनीने बुधवारी जगभरातील सर्व साठे माघारी बोलाविले. भारतात डिसेंबर २०२१पासून कोविशिल्डचे उत्पादन आणि वितरण थांबविण्यात आल्याचे सीरमने स्पष्ट केले आहे.