बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून परदेशात जाऊन बसलेले उद्योगपती विजय मल्ल्या यांना भारतात परत आणण्याच्या भारत सरकारच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. विजय मल्ल्या यांना भारतात पाठवू शकत नसल्याची माहिती ब्रिटनकडून भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला देण्यात आली आहे. ब्रिटनने दिलेल्या स्पष्टीकरणाबाबतचे निवेदन देखील परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. तेथील कायद्यानुसार एखाद्या परदेशी व्यक्तीने ब्रिटनमध्ये राहण्याचा कालावधी वाढवला असेल, तर त्याच्याजवळ वैध पासपोर्ट असणे हे बंधनकारक नाही. त्यामुळे विजय मल्ल्या यांना आम्ही भारतात पाठवू शकत नाही. पण मल्ल्या यांच्याविरोधात असलेल्या आरोपांचे गांभीर्य आणि भारत सरकारची विनंती याची दखल नक्की घेतली जाईल, असे ब्रिटनने भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला दिलेल्या स्पष्टीकरणात नमूद करण्यात आले आहे.

पासपोर्ट रद्द करून किंवा मला अटक करून एकही छदाम मिळणार नाही- विजय मल्ल्या

भारतीय पासपोर्ट कायदा १९६७ नुसार मल्ल्या यांचा पासपोर्ट परराष्ट्र मंत्रालयाकडून रद्द करण्यात आला होता. याशिवाय, मल्ल्या यांना भारतात पाठवण्याची विनंती देखील भारताने ब्रिटन सरकारकडे केली होती. गेल्या महिन्याभरापासून ब्रिटनमध्ये असलेल्या मल्ल्यांवर विविध बँकांचे नऊ हजार कोटींचे कर्ज थकवल्या प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरु आहे.

विजय मल्ल्यांच्या खासदारकीचा राजीनामा मंजूर

Story img Loader