यूकेमध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीत मजूर पक्षाचा मोठा विजय झाला आहे. मजूर पक्षाने जवळपास ४०० पेक्षा जास्त जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे ऋषी सुनक यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ हुजूर पक्षाचा (कॉन्झर्व्हेटिव्ह) दारुण पराभव झाला. भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांना या पराभवानंतर पंतप्रधानपद सोडावे लागले, तर मजूर पक्षाचे (लेबर पार्टी) नेते कीर स्टार्मर यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या निवडणुकीत भारतीय वंशाच्या शिवानी राजा यांनी यूकेमधील लीसेस्टर पूर्वमधून मोठा विजय मिळवत त्या खासदार झाल्या आहेत. शिवानी राजा यांनी मंगळवारी खासदारकीची शपथ घेतली. त्यांचा हा शपथ घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याचं कारण म्हणजे शिवानी राजा यांनी खासदार म्हणून शपथ घेत असताना त्यांच्या हातात भगवद्गीता होती.

हेही वाचा : VIDEO : व्हिएनात ऑस्ट्रियन कलाकारांकडून वंदे मातरम गाऊन पंतप्रधान मोदींचं स्वागत

यूकेमधील लीसेस्टर पूर्व हा मजूर पक्षाचा बालेकिल्ला मानला जायचा. मात्र, भारतीय वंशाच्या शिवानी राजा यांनी येथून विजय मिळवला. दरम्यान, शिवानी राजा यांनी खासदारकीची शपथ घेतानाचा एक व्हिडीओ एक्स अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी लिहिले की, “लीसेस्टर पूर्वचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आज संसदेत शपथ घेणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. तसेच शपथ घेताना मला अभिमान वाटला.”

दरम्यान, शिवानी राजा यांनी १४ हजार ५२६ मते मिळवत त्यांच्या विरोधी उमेदवाराचा ४ हजार ४२६ मतांनी पराभव केला. यूकेमध्ये ६५० जागांवर निवडणूक झाली. या निवडणुकीत मजूर पक्षाने ४१२ जागा जिंकल्या आहेत. तर ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा (कॉन्झर्व्हेटिव्ह) पक्षाला फक्त १२१ जागा जिंकता आल्या आहेत. खासदार शिवानी राजा यांची आई राजकोटच्या आहेत तर वडील गुजराती आहेत. शिवानी राजा यांचा जन्म लीसेस्टरमध्ये झालेला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uk elections 2024 mp shivani raja indian origin sworn in as an mp in the uk bhagavad gita gkt