लंडन : ब्रिटनमध्ये १४ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर, पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या नेतृत्वाखालील हुजूर (कंझर्व्हेटिव्ह) पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. देशातील अनेक जटिल प्रश्न सोडविण्यात आलेले अपयश, सातत्याने नेतृत्वबदल, पक्षांतर्गत मतभेद, पक्षफुटी अशा अनेक आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या या पक्षाला ब्रिटनच्या जनतेने सत्तेतून खाली खेचले. अर्थव्यवस्थेच्या स्थितीपासून ते आरोग्यसेवेपर्यंत पक्षाची सत्ता गमावण्याची काही प्रमुख कारणे आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सुनक सरकारच्या पराभवाचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे गेल्या काही वर्षांत ब्रिटनमध्ये आलेल्या आर्थिक संकटांची मालिका. ऋषी सुनक ब्रिटनमधील आर्थिक व्यवस्था सुरळीत करण्यात अपयशी ठरले. अर्थव्यवस्थेच्या मंद वाढीमुळे ब्रिटन त्रस्त असून इतर मोठ्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत देश खूपच वाईट कामगिरी करत आहे. २०२३ मध्ये, ब्रिटनची अर्थव्यवस्था किरकोळ टक्क्यांनी वाढली आणि या वर्षाच्या सुरुवातीला अर्थव्यवस्थेत मंदी आली.
हेही वाचा >>> भाजपकडून २४ राज्यांमध्ये नवे प्रभारी
ऋषी सुनक पंतप्रधान झाल्यानंतर ते सर्वात प्रथम महागाई नियंत्रणात आणतील अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. याउलट ऑक्टोबर २०२२ मध्ये महागाई ४० वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आणि ती नुकतीच खाली आली आहे. परंतु यामुळे तेथील गरीब नागरिक संतप्त झाले आहेत. सार्वजनिक सेवा कोलमडल्या आहेत. नॅशनल हेल्थ सर्व्हिस – सार्वजनिक, परवडणारी आरोग्यसेवा निधीच्या संकटामुळे कोलमडली आहे. सामान्य नागरिकांना वेळेवर आणि स्वस्त आरोग्य सेवा मिळणे कठीण होत आहे, ज्यामुळे हुजूर पक्षाच्या विरोधात संताप निर्माण झाला आहे. निर्वासितांची समस्या हाताळण्यातही हुजूर पक्ष अपयशी ठरला.
कोण आहेत कीर स्टार्मर?
हुजूर पक्षाची सत्ता संपुष्टात आणणारे मजूर पक्षाचे नेते कीर स्टार्मर यांचा लंडनजवळच्या सरे येथे एका कामगार कुटुंबात १९६३ साली जन्म झाला. कायद्याची पदवी घेतल्यानंतर १९८७ साली त्यांनी वकिली सुरू केली. मानवी हक्कांचे संरक्षण हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. जुलै २००८ मध्ये त्यांची स्कॉटलंड, इंग्लंड, वेल्सचे ‘क्राऊन प्रॉसिक्युशन सर्व्हिस’चे प्रमुख आणि सार्वजनिक अभियोग संचालकपदी नियुक्ती झाली. वयाच्या पन्नाशीत स्टार्मर यांनी राजकारणात प्रवेश केला. २०१५ साली लंडनमधील मजूर पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या हॉलबॉर्न अँड सेंट पँकर्स मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत ते हाऊस ऑफ कॉमन्सवर सर्वप्रथम निवडून गेले. २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत ते पुन्हा पार्लमेंट सदस्य झाले.
मजूर पक्षाचे तत्कालीन नेते जेरेमी कॉर्बिन यांच्या ‘शॅडो कॅबिनेट’मध्ये त्यांनी गृह, स्थलांतरित अशा विभागांचे काम केले आहे. २०१९मधील सार्वत्रिक निवडणुकीत कॉर्बिन यांचा पराभव झाल्यानंतर मजूर पक्षाची सूत्रे स्टार्मर यांच्याकडे आली.
निरोपाच्या भाषणात सुनक भावूक
पंतप्रधान म्हणून त्यांच्या निरोपाच्या भाषणात ऋषी सुनक भावूक झाले. त्यांनी मतदारांची माफी मागितली. पंतप्रधान म्हणून आपली कर्तव्ये पूर्ण समर्पणाने पार पाडली असे त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीत पराभूत झालेल्या आपल्या पक्षाच्या सहकाऱ्यांचीही त्यांनी माफी मागितली. सुनक म्हणाले, ‘‘मी या पदावर पूर्ण प्रामाणिकपणे काम केले आहे, पण तुम्ही स्पष्ट संकेत दिलेत की ब्रिटिश सरकार बदलावे लागेल. तुमचा निर्णय महत्त्वाचा आहे. मी या पराभवाची जबाबदारी घेतो… या निकालानंतर, मी लगेचच नाही, तर माझ्या उत्तराधिकारी निवडीची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर पक्षाचे नेतेपद सोडेन,’’ असे सुनक म्हणाले. सुनक यांनी संसदेतील नवीन विरोधी पक्षाची ‘महत्वाची भूमिका’ घेण्यासाठी आपल्या पक्षामध्ये फेरबदल करण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यांनी त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांचे स्वागत केले आणि ते म्हणाले, ‘सर कीर स्टार्मर लवकरच आमचे पंतप्रधान होतील, आणि त्यांचे यश हे आपल्या सर्वांचे यश असेल, आणि मी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला शुभेच्छा देतो.’ त्यांनी कृतज्ञता व्यक्त करून आपले भाषण संपवले. डाऊनिंग स्ट्रीट येथे आपल्या कुटुंबासोबत साजरी केलेल्या दिवाळीच्या आठवणीही त्यांनी सांगितल्या.