UK General Election 2024 Result : ब्रिटनचे मावळते पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा सार्वत्रिक निवडणुकीत दारूण पराभव झाला असून विरोधी पक्ष असलेल्या मजूर पक्षाला ६५० सदस्यांच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ४००पेक्षा जास्त जागा जिंकण्यात यश मिळाले आहे. तर सुनक यांचा हुजूर पक्षाने ११० जागांवर आघाडी घेतली आहे. निकाल जाहीर होत असताना ऋषी सुनक यांनी आपल्या समर्थकांना संबोधित करत असताना सदर पराभवाची जबाबदारी स्वीकारली. “सार्वत्रिक निवडणुकीत मजूर पक्षाचे नेते सर कीर स्टार्मर यांनी विजय मिळविला असून मी त्यांना शुभेच्छा देतो. आज अतिशय शांत वातावरणात सत्तांतर होत आहे. भविष्यात देशात स्थिरता निर्माण होण्यासाठी आजच्या निकालातून नक्कीच आत्मविश्वास मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करतो”, अशी प्रतिक्रिया ऋषी सुनक यांनी दिली.

UK Election Result 2024 : ब्रिटनमध्ये सत्तांतर! भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा पराभव, मजूर पक्षाची विजयी घौडदौड!

Maharashtra Deputy CM Ajit Pawar Dissolves NCP Beed Unit
राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; मंत्री धनंजय मुंडे यांना धक्का
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
ajit pawar ncp latest news in marathi
अजित पवार स्वबळावर लढणार का ?
jitendra awhad sharad pawar (1)
शरद पवारांकडून RSS चं कौतुक, भाजपाशी जवळीक वाढल्याची चर्चा; आव्हाड म्हणाले, “आम्ही संघाच्या विचारसरणीचं…”
Jitendra Awhad vs Dhananjay Munde
“परळीत मतदान केंद्रावर शाई लावून बाहेर जायचं, ती गँग बटण दाबायची”, व्हिडीओ शेअर करत जितेंद्र आव्हाडांचा दावा
ec hearing against district collector dr sachin ombase for obstructing election process
लोकसभा निवडणुकीत जिल्हाधिकार्‍यांचा सावळा गोंधळ; निवडणूक आयोगाकडून दखल; जिल्हाधिकार्‍यांची सुनावणी
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “पक्ष वगैरे न बघता…” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया
Sanjay Raut On Municipal Corporation election
Sanjay Raut : मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार? संजय राऊतांचं मोठं भाष्य; म्हणाले, “दिल्लीत जे घडलं तेच…”

मी माफी मागतो – सुनक

पराभव स्वीकारत असताना सुनक यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची माफी मागितली. खिलाडू वृत्तीने त्यांनी हा पराभव स्वीकारला. सुनक आज ब्रिटनचे राजे तिसरे किंग चार्ल्स यांच्याकडे आपला राजीनामा सादर करणार आहेत. त्यानंतर किंग चार्ल्स हे स्टर्मर यांनी संसदेतील सर्वात मोठा पक्ष या नात्याने सरकार स्थापनेचा दावा करण्यास सांगतील.

विश्लेषण: ब्रिटनमध्ये ऋषी सुनक आणि हुजूर पक्षाचा ऐतिहासिक, दारूण पराभव… मजूर पक्षाच्या अभूतपूर्व विजयाची कारणे कोणती?

ब्रिटनमध्ये गेल्या काही काळापासून घसरलेली अर्थव्यवस्था, सार्वजनिक सेवेची वाताहत, बेरोजगारी आणि गृहनिर्माणासारख्या प्रश्नांनी जनता त्रस्त झाली होती. या समस्यांचा सामना करण्यास असमर्थ ठरलेल्या हुजूर पक्षाला जनतेने मतदानाच्या माध्यमातून बाजूला सारले असले तरी मजूर पक्षासमोर या आव्हानांचा सामना करण्याचे मोठे आव्हान उभे राहिलेले आहे.

सार्वत्रिक निवडणुकीत फार मोठा विजय मिळवूनही मजूर पक्ष आणि स्टार्मर यांना म्हणावा तितका आनंद झालेला नाही, असे ब्रिटनमधील विश्लेषकांचे म्हणणे आहे. कारण ब्रिटनच्या कठीण काळात मजूर पक्ष सत्तेवर येत आहे, त्यामुळे त्यांना हुजूर पक्षाच्या १४ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.

Story img Loader