सात बाळांचा जीव घेणाऱ्या ब्रिटिश नर्सला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लुसी लेटबी असं या ३३ वर्षीय नर्सचं नाव आहे. तिने सात बाळांचा जीव घेतला. २०१५ ते २०१६ या कालावाधीत सात नवजात अर्भकांची हत्या केल्याप्रकरणी लुसी लेटबीला अटक करण्यात आली. शुक्रवारी तिला दोषी ठरवण्यात आलं. त्यानंतर आता कोर्टाने तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

ब्रिटिश नर्स लुसी लेटबी आता यु. के.च्या इतिहासातली सर्वाधिक अर्भकांचा बळी घेणारी खुनी महिला ठरली आहे. ज्या रुग्णालयात ती काम करत होती तिथे लुसीने ब्लड फ्लो किंवा दुध पाजण्याच्या ट्युबमधून हवा भरुन, विषारी इंजेक्शनं देऊन, प्रमाणापेक्षा जास्त दूध पाजून आणि इन्शुलिन देऊन मुलांना ठार केलं. ज्या सात मुलांचा मृत्यू झाला त्यामध्ये एक दिवसाचं एक बाळही होतं.

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Woman dies after falling off her bike in Kondhwa Pune news
कोंढव्यात दुचाकी घसरुन महिलेचा मृत्यू; दुचाकीस्वार पती जखमी
kama Hospital study shows increased diabetes prevalence in pregnant women due to changing lifestyles
गर्भधारणेच्या वेळी महिलांना मधुमेहाचा धोका
Supreme Court on maternity leave
दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
chatura cesarean delivery
स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना

८ जून २०१५ ला केली पहिली हत्या

लुसी लेटबीने ८ जून २०१५ या दिवशी पहिल्यांदा बाळाची हत्या केली. या सगळ्या लहान बाळांची ओळख कोर्टाने गोपनीय ठेवली आहे. मात्र कोर्टाच्या कामाजात यांच्या नावांचा उल्लेख येऊ नये म्हणून त्यांना ए ते क्यू अशी अक्षरं देण्यात आली आहे. ए नावाच्या बाळाला जेव्हा लुसीने मारलं तेव्हा तिने आपल्या सहकाऱ्यांना मेसेज केला होता की या बाळाच्या मृत्यूनंतर आपल्याला खूपच वाईट वाटलं आहे. तसंच या बाळाच्या आई वडिलांसमोर तिने आपण खूपच घाबरुन गेलो आहोत असा बनावही रचला होता. २०१५ ते २०१६ या कालावधीत तिने १३ मुलांवर असा गुप्त हल्ला केला. त्यातल्या सात मुलांचा मृत्यू झाला.

लुसी लेटबीचं हे प्रकरण नेमकं काय?

लुसी लेटबी या नर्सने २०१५ ते २०१६ या कालावधीत १३ नवजात अर्भकांवर गुप्तपणे हल्ला केला. कधी त्यांच्या पोटात हवा भरुन, कधी त्यांना प्रमाणापेक्षा जास्त दूध पाजून, कधी त्यांना इन्सुलिनमधून विष देऊन तिने ठार केलं. या प्रकरणात लुसी लेटबीला तीनवेळा अटक झाली. तर शुक्रवारी तिला कोर्टाने दोषी ठरवलं. या प्रकरणात ज्या मुलांचा जीव गेला, त्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे. तसंच ज्या अर्भकांचा जीव गेला त्यांच्या आई वडिलांनी हे म्हटलं आहे की आम्ही जो विदारक अनुभव घेतला ते दुःख कधीही कुणाच्या वाट्याला येऊ नये.

 इंग्लंडमध्ये सात बाळांचा जीव घेणाऱ्या नर्सला अटक करण्यात आली आहे. तिच्या अटकेसाठी भारतीय वंशाचे डॉक्टर रवि जयराम यांची मोलाची मदत झाली. इंग्लंडमधल्या काऊंटेस ऑफ चेस्टर या रुग्णालयात काम करणाऱ्या एका ब्रिटीश नर्सने सात बाळांची हत्या केली. लुसी लेटबी (वय ३३) असं या नर्सचं नाव आहे. सात बाळांच्या हत्येप्रकरणी लुसीला शुक्रवारी दोषी ठरवण्यात आलं. हे प्रकरण २०१५ मधलं आहे. या प्रकरणात भारतीय वंशाचे डॉ. रवि जयराम यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. त्यामुळेच नर्स लुसीला अटक करण्यात आली आणि दोषीही ठरवण्यात आलं.