कोहिनूर हिऱ्यावर भारताचा कायदेशीर हक्क नसल्याचे इंग्लंडकडून स्पष्ट करण्यात आल्यामुळे हा हिरा भारतात परत आणण्याच्या आशा आणखी धुसर झाल्या आहेत. कोहिनूर हिरा भारताला परत करण्यासाठी इंग्लंड सरकार बांधिल नाही. कोहिनूर हिरा भारताला परत करण्यास कोणताही कायदेशीर आधार नाही, असे ब्रिटनचे आशिया आणि पॅसिफिक मंत्री अलोक शर्मा यांनी सांगितले. जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा ईस्ट इंडिया कंपनी घेऊन गेली हे म्हणणे खरे नसून, शीख राजे महाराज रणजितसिंग यांनी तो ब्रिटनला भेट दिला होता, असे सांगत केंद्र सरकारने यापूर्वीच असमर्थता व्यक्त केली होती. इंग्रज व शीख यांच्यात झालेल्या युद्धात ब्रिटनने तत्कालीन अविभाजित पंजाबमधील शीख साम्राज्यावर ताबा मिळवला होता. त्यानंतर १८५० साली १०८ कॅरटचा हा हिरा तत्कालीन ब्रिटिश सम्राज्ञी महाराणी व्हिक्टोरिया यांना भेट म्हणून देण्यात आला होता. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार आता सांस्कृतिक मंत्रालय आणि सरकार कायदेशीर मार्गापेक्षा शिष्टाईच्या मार्गाने कोहिनूर परत आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. यासाठी सरकार सर्वोच्च न्यायालयात १५ ऑगस्टपूर्वी याचिका दाखल करणार असल्याचे समजते.
Ministry of Culture, Govt of India to try bringing Kohinoor back to India through diplomatic channels than legal means: Sources
— ANI (@ANI_news) July 27, 2016
Sources say that the Government of India will submit a new affidavit in Supreme court before August 15th #Kohinoor
— ANI (@ANI_news) July 27, 2016
New affidavit that will be filed by the govt in the SC will reiterate India’s resolve to bring back the #Kohinoor says sources to ANI
— ANI (@ANI_news) July 27, 2016
Alok Sharma, Minister of Asia and Pacific affairs, UK on Kohinoor : It is a longstanding position of UK government (cont)
— ANI (@ANI_news) July 27, 2016
(cont)that we don’t believe there are any legal ground for restitution of diamond:Alok Sharma,Min of Asia & Pacific affairs,UK on Kohinoor
— ANI (@ANI_news) July 27, 2016