‘इन्फोसिस’ने २०२२-२३ या वर्षासाठी आपल्या भागधारकांना प्रति शेअर १६.५० रुपयांचा अंतरिम लाभांश (Dividend) जाहीर केला आहे. कंपनीच्या या निर्णयाने ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी आणि ‘इन्फोसिस’चे अध्यक्ष नारायण मूर्ती यांच्या कन्या अक्षता मूर्ती यांना तब्बल ६४ कोटी २७ लाखांचा लाभांश मिळणार आहे. अक्षता यांच्याकडे ‘इन्फोसिस’चे ३.८९ कोटी शेअर्स म्हणजेच ०.९३ टक्के भागीदारी आहे.

ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता यांना इन्फोसिसकडून १२६.६१ कोटींचे लाभांश उत्पन्न

अक्षता मूर्ती यांनी सुनक यांच्याशी २००९ मध्ये विवाह केला. त्यांच्याकडे भारताचं नागरिकत्व आहे. भारतात जन्मलेल्या ४२ वर्षीय अक्षता मूर्ती यांची संपत्ती आजमितीस १.३ अब्ज अमेरिकन डॉलर्सची आहे. २००१ मध्ये ‘इन्फोसिस’मधील भागधारक असल्याचे त्यांनी सार्वजनिकरित्या जाहीर केल्यानंतर बंगळुरूस्थित या कंपनीच्या शेअर्समध्ये दोन हजार टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती.

नारायण मूर्तींचा कानमंत्र ठरला टर्निंग पॉइंट, ऋषी सुनक यांनी सांगितला पंतप्रधानपदापर्यंत पोहचण्याचा प्रवास

‘स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेस’मधून अक्षता यांनी २००६ साली एमबीए केलं. ‘लिंक्डइन’ या सोशल पोर्टलवर त्या ‘द कॅपिटल अँड प्रायव्हेट इक्विटी फर्म कॅटामरान व्हेंचर्स’, ‘द जिम चेन डिग्मा फिटनेस’, ‘द जंटलमन आऊटफिटर्स न्यू अण्ड लिंग्वूड’ या तीन कंपन्यांच्या संचालक म्हणून कार्यरत असल्याची माहिती उपलब्ध आहे.