देशासाठी धोकादायक असलेल्या प्रतिबंधित व्यक्तींची यादी ब्रिटन सरकारने नुकतीच तयार केली. या यादीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि पाकिस्तानस्थित दहशतवादी आणि दहशतवादी संघटना यांचा समावेश आहे. या प्रतिबंधित व्यक्तींची ब्रिटनमधील संपत्ती गोठवण्याचे आदेश ब्रिटिश सरकारने दिले आहेत.
दाऊद इब्राहिम हा १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटांतील मुख्य आरोपी आहे. त्याची जगभरातील संपत्ती गोठवण्याची सूचना संयुक्त राष्ट्रे आणि युरोपीयन युनियनने यापूर्वीच दिले आहेत. भारताने त्याच्याविरोधात आंतरराष्ट्रीय वॉरंट काढले आहे. त्यामुळे ब्रिटन सरकारने त्यांच्या देशातील त्याची संपत्ती जप्त करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
संसदेवर २००१मध्ये झालेल्या हल्ल्याचे सूत्रधार असलेली जश्न-ए-मोहम्मद ही संघटनाही या यादीत समाविष्ट आहे. हरकत-उल-मुजाहिदिन, लष्कर-ए-तय्यबा, अल-अखतर ट्रस्ट इंटरनॅशनल आणि हरकत-उल जिहाद इस्लामी या संघटनांची संपत्तीही गोठवण्यात येणार आहे. लष्कर-ए-तय्यबाच्या वित्त विभागाचा प्रमुख हाजी मुहम्मद अश्रफ, मूळचा भारतीय असलेला आणि आता सौदी अरेबियामध्ये लष्कर-ए-तय्यबाची सूत्रे सांभाळणारा मोहम्मद बहाझिक यांचाही या प्रतिबंधित यादीत समावेश आहे.
दाऊदची ब्रिटनमधील संपत्ती गोठवणार
देशासाठी धोकादायक असलेल्या प्रतिबंधित व्यक्तींची यादी ब्रिटन सरकारने नुकतीच तयार केली. या यादीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि पाकिस्तानस्थित दहशतवादी आणि दहशतवादी संघटना यांचा समावेश आहे.
First published on: 19-02-2014 at 02:03 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uk to seize dawood ibrahim property