देशासाठी धोकादायक असलेल्या प्रतिबंधित व्यक्तींची यादी ब्रिटन सरकारने नुकतीच तयार केली. या यादीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि पाकिस्तानस्थित दहशतवादी आणि दहशतवादी संघटना यांचा समावेश आहे. या प्रतिबंधित व्यक्तींची ब्रिटनमधील संपत्ती गोठवण्याचे आदेश ब्रिटिश सरकारने दिले आहेत.
दाऊद इब्राहिम हा १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटांतील मुख्य आरोपी आहे. त्याची जगभरातील संपत्ती गोठवण्याची सूचना संयुक्त राष्ट्रे आणि युरोपीयन युनियनने यापूर्वीच दिले आहेत. भारताने त्याच्याविरोधात आंतरराष्ट्रीय वॉरंट काढले आहे. त्यामुळे ब्रिटन सरकारने त्यांच्या देशातील त्याची संपत्ती जप्त करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
संसदेवर २००१मध्ये झालेल्या हल्ल्याचे सूत्रधार असलेली जश्न-ए-मोहम्मद ही संघटनाही या यादीत समाविष्ट आहे. हरकत-उल-मुजाहिदिन, लष्कर-ए-तय्यबा, अल-अखतर ट्रस्ट इंटरनॅशनल आणि हरकत-उल जिहाद इस्लामी या संघटनांची संपत्तीही गोठवण्यात येणार आहे. लष्कर-ए-तय्यबाच्या वित्त विभागाचा प्रमुख हाजी मुहम्मद अश्रफ, मूळचा भारतीय असलेला आणि आता सौदी अरेबियामध्ये लष्कर-ए-तय्यबाची सूत्रे सांभाळणारा मोहम्मद बहाझिक यांचाही या प्रतिबंधित यादीत समावेश आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा