वृत्तसंस्था, कीव्ह (युक्रेन) : रशियाच्या क्षेपणास्त्रांनी युक्रेनची राजधानी कीव्हच्या वीज आणि पाणीपुरवठा यंत्रणांना शनिवारी लक्ष्य केले. क्षेपणास्त्रांमध्ये वीज कंपनी ‘युक्रेनर्गो’च्या अनेक आस्थापनांचे मोठे नुकसान झाले असून आगामी काळात नागरिकांना वीज आणि पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युक्रेनमधील नियोजित ठिकाणे नष्ट केली असून नजीकच्या काळात मोठय़ा हल्ल्यांची गरज नाही, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन शुक्रवारी म्हणाले होते. मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी कीव्हमधील वीज कंपनीचे केंद्र तसेच पाणीपुरवठय़ाची ठिकाणे रशियाच्या क्षेपणास्त्रांनी नष्ट केली. मात्र या हल्ल्यात कुणीची जखमी अथवा मृत झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

  कंपनीचे कर्मचारी सेवा

पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत असले तरी नागरिकांना काही दिवस गैरसोयींचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा ‘युक्रेनर्गो’ने दिला. त्यानंतर युक्रेन राष्ट्राध्यक्ष कार्यालयाचे उपप्रमुख किरिलो तिमोशेन्को यांनी नागरिकांनी वीज आणि पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले.