नवी दिल्ली : दीड हजारहून अधिक भारतीयांना घेऊन आठ विमाने सोमवारी युद्धग्रस्त युक्रेनमधून भारतात येतील, असे असे नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने रविवारी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 रशियाच्या लष्करी आक्रमणामुळे युक्रेनचे हवाई क्षेत्र २४ फेब्रुवारीपासून बंद करण्यात आले आहे. युक्रेन सोडून बाहेर पडणाऱ्या भारतीयांना रुमानिया, हंगेरी, स्लोव्हाकिया व पोलंड यांसारख्या युक्रेनच्या शेजारी देशांतून विमानाने परत आणले जात आहे.

 भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी ‘ऑपरेशन गंगा’अंतर्गत २१३५ भारतीयांना रविवारी ११ विशेष नागरी विमानांतून युक्रेनच्या शेजारी देशांमधून आणण्यात आले, असे मंत्रालयाने एका निवेदनात सांगितले.

 ‘उद्या (सोमवारी) आठ विशेष विमाने चालवली जाणे अपेक्षित आहे. यापैकी पाच विमाने बुडापेस्ट येथून, दोन सुकेआवा येथून व एक विमान बुखारेस्टहून निघणार असून, त्यांतून १५००हून अधिक भारतीयांना देशात परत आणले जाईल,’ असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

 भारतीय हवाई दलाने ‘ऑपरेशन गंगा’अंतर्गत आतापर्यंत २०५६ प्रवाशांना परत आणण्यासाठी १० विमानांच्या फेऱ्या केल्या असून, २६ टन मदतसामग्री त्या देशांमध्ये नेली आहे.  हवाई दल सी-१७ लष्करी वाहतूक विमानांच्या साहाय्याने ही उड्डाणे करत आहे. नागरी विमाने इंडिगो, एअर इंडिया, विस्तारा व स्पाइसजेट यांसारख्या भारतीय विमान कंपन्यांमार्फत संचालित केली जात आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ukraine crisis aviation ministry says 8 flights to bring back over 1500 indians
Show comments