पाश्चिमात्य देशांच्या पाठिंब्यावर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान झालेले पेट्रो पोरोशेन्को यांनी अखेर पूर्वेकडील बंडखोरांशी चर्चेची तयारी दर्शवली आहे. ही चर्चा ज्या बंडखोरांनी शस्त्रे खाली ठेवली आहेत आणि ज्यांचा विश्वास शांततेवर आहे, अशा बंडखोरांशीच असेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. रशिया समर्थक बंडखोरांचा देशाला असलेला धोका संपवण्यासाठी पोरोशेन्को यांनी ही योजना तयार केली आहे.
आठवडय़ाच्या एकतर्फी शस्त्रसंधीनंतर पोरोशेन्को यांनी ही घोषणा केली आहे. पूर्व भागात झालेल्या हिंसाचारांत आजवर ३७५ जण ठार झाले आहेत, तर हजारो जण विस्थापित झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा