युक्रेनच्या ईशान्य भागातील सुमी या शहरातून स्थलांतरित करण्यात आलेला ६०० भारतीय विद्यार्थ्यांचा अखेरचा मोठा गट गुरुवारी रात्री विशेष विमानांनी मायदेशी रवाना झाला. या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी भारताकडून तीन विमाने पाठवण्यात आली होती.
पोल्तावा या शहरातून या विद्यार्थ्यांना बुधवारी विशेष रेल्वेगाडीने पश्चिम युक्रेनमधील ल्यिव शहरात आणण्यात आले. त्यानंतर ल्यिव शहरातून दुसऱ्या विशेष रेल्वेगाडीने पोलंडमध्ये आणण्यात आले. पोलंडमधून तीन विशेष विमानांनी या विद्यार्थ्यांना भारतात आणण्यात येत आहे. पहिल्या विमानाने स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ४.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार
रात्रीचे ९) उड्डाण केले. दुसऱ्या विमानाने ५.३० वाजता
(भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्रीचे १०.३०) आणि तिसऱ्या विमानाने ६.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्रीचे ११.३०) उड्डाण केले.
‘‘आम्ही नुकतेच पोलंडमध्ये पोहोचलो असून लवकरच विशेष विमानाने मायदेशी परतणार आहोत,’’ असे जिस्ना जिजी या विद्यार्थिनीने सांगितले. युद्धजन्य युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेश परत आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ ही मोहीम राबवली आहे.