युक्रेनकडून क्रायमियाचा ताबा घेतल्याने चिडलेल्या अमेरिका व युरोपीय समुदायाला खिजवण्यासाठी आता रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनवरील वाढत्या कर्जाचा बागुलबुवा उभा केला आहे. युक्रेनला कर्जाच्या खाईत लोटल्यास त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील असा इशारा पुतिन यांनी युरोपीय महासंघाच्या नेत्यांना दिला आहे.
रशियाने युक्रेनला भरमसाठ कर्ज देऊन नैसर्गिक वायूचा पुरवठा केला आहे. हा नैसर्गिक वायू युरोपीय समुदायांनी खरेदी न केल्यास त्याच्यावरील कर्जाचा डोंगर वाढत जाईल व त्याचे अंतिम परिणाम युरोपीय महासंघाला भोगावे लागतील असे पुतिन यांनी स्पष्ट केले आहे. युक्रेन रशियाला १६ अब्ज डॉलरचे देणे लागतो. युरोपीय महासंघाला नैसर्गिक वायूचा पुरवठा निíवघ्नपणे व्हावा यासाठीच हे कर्ज देण्यात आले आहे. मात्र, आता पुरवठा ठप्प झाला असून यात युरोपीय महासंघाचेच नुकसान आहे. त्यामुळे युरोपीय नेत्यांनी तातडीने हालचाली करून युक्रेनकडून नैसर्गिक वायू घ्यावा असे पुतिन यांनी सूचवले असल्याचे पुतिन यांचे माध्यम सचिव दिमित्री पेस्कोव्ह यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
युरोपीय महासंघाला रशियाकडून होणारा नैसर्गिक वायू व तेलाचा पुरवठा बव्हंशी युक्रेनच्या माध्यमातूनच केला जातो. क्रायमिया पेचप्रसंगानंतर पुतिन सरकारने युक्रेनची आर्थिक कोंडी केली आहे. युक्रेनच्या आर्थिक नाडय़ा आवळून युरोपीय महासंघाला परस्पर कोंडीत पकडण्याचा रशियाचा डाव आहे. या पाश्र्वभूमीवर पुतिन यांनी हा इशारा दिला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Apr 2014 रोजी प्रकाशित
युक्रेनला कर्जाच्या खाईत लोटू नका
युक्रेनकडून क्रायमियाचा ताबा घेतल्याने चिडलेल्या अमेरिका व युरोपीय समुदायाला खिजवण्यासाठी आता रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनवरील वाढत्या कर्जाचा बागुलबुवा उभा केला आहे.

First published on: 11-04-2014 at 03:44 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ukraine crisis vladimir putin ups economic pressure