एपी, किव्ह : रशियाचे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या सैन्याला शुक्रवारी ३६ तासांचा युद्धविरामाचा एकतर्फी दिलेला आदेश संदिग्ध आहे, असे युक्रेनचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी रशियाचे हे पाऊल एक खेळी असल्याचे सांगून फेटाळून लावला आहे. मात्र, त्यांनी युक्रेनचे सैन्य युद्धविरामाचे पालन करतील किंवा नाही, याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. दुसरीकडे युक्रेनने युद्ध सुरू ठेवल्यास प्रत्त्युत्तर देण्यात येईल किंवा नाही, याबाबत रशियानेही स्पष्टीकरण दिले नाही.

सुमारे ११ महिन्यांच्या युद्धकाळात रशियाकडून पहिल्यांदा घोषित युद्धविराम मास्कोच्या प्रमाणवेळेनुसार शुक्रवारी दुपारी सुरू झाला. तो शनिवारी मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणार आहे. युद्धविरामाच्या उल्लंघनाचे आतापर्यंत कोणतेही वृत्त नाही.

रशियामध्ये पारंपरिक नाताळनिमित्त (ज्युलियन कॅलेंडरनुसार) सात जानेवारीला सार्वजिनक सुटी असते. या निमित्त युद्धविराम जाहीर करावा, अशी मागणी रशियाच्या पुराणमतवादी चर्चचे प्रमुख पॅट्रिआर्क किरिल यांनी केले होते.

युक्रेन आणि पाश्चमात्य अधिकाऱ्यांनी सद्भावनेच्या संकेतामागे संशयास्पद हेतू असल्याची शंका व्यक्त केली आहे. युक्रेनचे राष्ट्रपती वालोदिमिर झेलेंक्सी यांनी रशियाच्या हेतूवर संशय व्यक्त करताना रशियाने नव्या दमाने युद्ध सुरू करण्यासाठी हा ‘युद्धविराम’ जाहीर केला आहे, असा आरोप केला.