रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अद्याप संपलेले नाही. ९ महिन्यानंतरही या दोन्ही देशांमधील सैनिक एकमेकांवर हल्ले करत आहेत. या युद्धात दोन्ही बाजुंनी मोठी जीवित तसेच वित्तहानी होत आहे. असे असतानाच युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या पत्नी ओलेना झेलेन्स्का यांनी रशियावर गंभीर आरोप केले आहेत. रशियान सैनिकांच्या पत्नींकडून युक्रेनमधील महिलांवर बलात्कार, लैंगिक अत्याचार करण्यास प्रोत्साहित केले जाते, असे झेलेन्स्का म्हणाल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>Gujarat Election 2022 : सोशल मीडियावरील प्रचारात भाजपा पिछाडीवर! आप सर्वांत पुढे; काँग्रेसचे प्राधान्य ‘भारत जोडो यात्रे’ला

एका आंतरारष्ट्रीय परिषदेत लैंगिक हिंसाचारावर बोलताना झेलेन्स्का यांनी हा आरोप केला आहे. “एखाद्यावर प्रभुत्व मिळवायचे असेल लैंगिक हिंसाचाराचा वापर केला जातो. हा सर्वात क्रूर मार्ग आहे. रशियन सैनिकांकडून बलात्कार, लैंगिक अत्याचाराचा शस्त्र म्हणून वापर होत आहे. बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराचा ते पद्धतशीरपणे शस्त्र म्हणून वापर करत आहेत,” असे झेलेन्स्का म्हणाल्या.

हेही वाचा >>> संतापजनक! ५ विद्यार्थ्यांकडून वर्गमैत्रिणीवर लैंगिक अत्याचार, कृत्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर केला शेअर

“रशियन सैनिक त्यांनी केलेल्या बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराबद्दल उघडपणे बोलताना आम्ही पाहिलेले आहे. आपल्या नातेवाईकांशी ते याबाबत फोनवर बोलतात. विशेष म्हणजे रशियन सैनिकांच्या पत्नीदेखील त्यांना लैंगिक अत्याचार करण्यास प्रोत्साहित करतात. तुम्ही जा आणि युक्रेनमधील महिलांवर बलात्कार करा. फक्त बलात्कार केल्यानंतर आम्हाला सांगू नका, असे या महिला रशियन सैनिकांना सांगतात,” असा दावा झेलेन्स्का यांनी केला.

हेही वाचा >>>चीनमधील आंदोलनात हाँगकाँगच्या नागरिकांचा सहभाग नको : सुरक्षा मंत्री

दरम्यान, झेलेन्स्का यांनी युद्धादरम्यान महिलांवर होणाऱ्या अत्याचारास ‘युद्ध गुन्हा’ गृहित धरण्यात यावे तसेच असे कृत्य करणाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी केली आहे. याआधीही युक्रेनमधील अनेक नेत्यांनी रशियन सैनिकांकडून युक्रेनमधील महिलांवर बलात्कार होत असल्याचा आरोप केला आहे. युक्रेनमधील खासदार लेसिया वासिलेन्क यांनी रिशयन सैनिकांकडून १० वर्षांच्या मुलींवरही बलात्कार होत आहेत, असे विधान केले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ukraine first lady olena zelenska alleges russian soldiers wives encourage attempt to rape ukraine women prd