हॅरी पॉटरचा सिनेमा म्हणजे स्वप्नांची दुनिया. हॅरी पॉटर, डंबलडोअर, वॉल्टडिमॉट आणि त्यातली सगळीच पात्रं ही अगदी खरीखुरी आणि आपण त्यांना खरंच कधीतरी भेटलो आहोत असा अनुभव देणारी. जगभरात हॅरी पॉटरचे चाहते आहेत. या सगळ्यांसाठी एक वाईट बातमी आहे.. ती बातमी म्हणजे हॅरी पॉटरच्या कॅसलला आग लागली आहे. तसंच या कॅसलचा काही भाग उद्ध्वस्त झाला आहे.
काय घडली घटना?
युक्रेन या ठिकाणी हा कॅसल होता. या कॅसलमध्येच हॅरी पॉटर सिनेमाच्या विविध भागांचं शूटिंग झालं आहे. या किल्ल्यावर रशियन मिसाईल हल्ला झाल्याने या किल्ल्याला आग लागली आहे. तसंच या घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला तर २३ जण जखमी झाले आहेत. युक्रेनमधल्या या वास्तूला मिसाईल हल्ल्यामुळे जी आग लागली ती आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आलं.
किव्हलोव्ह होम या ऐतिहासिक वास्तूला मिसाईल हल्ल्यात आग लागली आहे. लाल समुद्राच्या किनाऱ्यावर ही वास्तू आहे. या वास्तूला हॅरी पॉटरचा राजवाडा म्हटलं जातं. मिसाईल हल्ल्यानंतर या ठिकाणी आग लागली आहे. तसंच या किल्ल्याचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला आहे.
हॅरी पॉटर ही स्वप्नांची दुनियाच
हॅरी पॉटर बाळ असताना त्याच्या आई वडिलांचं मारलं जाणं, मग हॅग्रिडने त्याला सांभाळणं, विविध हल्ल्यांपासून वाचवणं, त्याला मिळालेल्या मायावी शक्ती, जादूचं विद्यालय, हरमायनी आणि रॉनसारखे मित्र, डंबलडोअर यांच्यासारखा पाठिराखा आणि वॉल्टडिमॉटचा त्याने खात्मा करणं हे सगळं सात भागांमध्ये मांडण्यात आलं होतं. हे सातही भाग खूप सुंदर होते. पहिल्या भागापासून सातव्या भागापर्यंतची उत्सुकता ताणली गेली होती. तसंच सिनेमाची लेखिका जे. के. रोलिंगचीही चर्चा चांगलीच झाली होती. त्याच हॅरी पॉटरच्या नावे असलेल्या हॅरी पॉटर कॅसल उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे हॅरी पॉटरचे चाहते हळहळले आहेत.
हे पण वाचा- ‘हॅरी पॉटर’मधील ‘डंबलडोअर’ काळाच्या पडद्याआड, मायकेल गॅम्बॉन यांचे निधन
हॅरी पॉटर हा जगात प्रसिद्ध झालेला चित्रपट
हॅरी पॉटरची भूमिका डॅनियल रॅडक्लिफने तर हरमायनीची भूमिका एमा वॅटसनने केली आहे. तर वॉल्टडिमॉट हा व्हिलन रालेफ फिनेसने साकारला आहे. या सिनेमातल्या पात्रांनी आणि त्यातल्या जादूच्या दुनियेने जगभरात एक प्रकारची क्रेझ निर्माण केली. सिनेमाच्या पहिल्या पार्टनंतर प्रत्येक पार्टसाठी प्रेक्षक वाट बघत असायचे. हॅरी पॉटरचा खास लूक, त्यातले विविध खेळ, जादूचे प्रयोग, रहस्य हे सगळं एखाद्या सुंदर स्वप्नासारखंच प्रेक्षकांना वाटलं. जे. के. रोलिंग यांनी लिहिलेली पुस्तकांची मालिकाही गाजली. आता याच हॅरी पॉटरच्या नावे असलेल्या हॅरी पॉटर कॅसलवर रशियाने मिसाईल हल्ला केला. ज्यात हा कॅसल उद्ध्वस्त झाला आहे. बीबीसीने याविषयीचं वृत्त दिलं आहे.