रशिया युक्रेनवर करत असलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये जगातील सर्वात मोठं कार्गो विमान नष्ट झालं नाही. युक्रेनमध्ये तयार करण्यात आलेलं अंटोंनोव्ह-२२५ मिर्या असं या जगातील सर्वात मोठ्या कार्गो विमानाचं नाव होतं. हे विमान किव्हजवळच्या होस्तोमील विमानतळावर करण्यात आलेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये नष्ट झालंय. युक्रेनमधील सरकारी हत्या निर्मिती कंपनी असणाऱ्या युक्रोबोरोनप्रोम या कंपनीने रविवारी यासंदर्भातील माहिती दिलीय.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: सैन्यासोबत युद्धग्रस्त देशात फिरणारा, पळून जाण्यास नकार देणार अन्…; लोक म्हणतात, “हाच युक्रेन युद्धाचा खरा हिरो”

“रशियन हल्लेखोरांनी युक्रेन हवाई क्षेत्रातील महत्वाचं आणि विशेष असं एएन-२२५ मिर्या विमान नष्ट केलंय. किव्हजवळच्या होस्टोमील एअरफिल्डवर हा सारा प्रकार घडलाय,” असं कंपनीने म्हटलंय. इतकच नाही तर विमान नष्ट झालं असलं तरी पुन्हा आम्ही ते निर्माण करु असा विश्वासही कंपनीने व्यक्त केलाय. “आम्ही पुन्हा या विमानाची बांधणी करु. आम्ही आमचं सशक्त, मुक्त आणि स्वतंत्र युक्रेनचं स्वप्न पूर्ण करु,” असंही कंपनीने म्हटलं आहे.

Seven maoists killed in abhujmad encounter
गडचिरोली : अबुझमाडमध्ये जवान व नक्षल्यांमध्ये जोरदार चकमक;  सात नक्षल्यांना कंठस्नान
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Russias Voronezh radar system
चीनची घुसखोरी रोखण्यासाठी भारताला रशियाची मदत! काय आहे वोरोनेझ रडार प्रणाली?
russia ins tushil
रशियाने भारताला सुपूर्द केली क्षेपणास्त्राने सुसज्ज युद्धनौका; ‘आयएनएस तुशील’ काय आहे? भारतासाठी याचे महत्त्व काय?
Cylinder explosion in Badlapur one injured
Cylinder explosion : बदलापुरात सिलेंडरचा स्फोट, एक जखमी
Image of Zelensky
Russia Vs Ukraine War : “जोपर्यंत नाटोचे सदस्यत्व…”, झेलेन्स्की यांनी का केली युक्रेनमध्ये परदेशी सैन्य तैनात करण्याची मागणी?
Russia Discovers Ancient Gold Treasure in Crimea — Ukraine Considers It Looting
“ते आमचा वारसा लुटत आहेत,” युक्रेनचा आरोप; रशियाने क्रिमियामध्ये शोधला प्राचीन सोन्याचा खजिना !
Navri Mile Hitlarla
“आता भूतासारखीच…”, लीला नेमकं काय करणार? पाहा ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय होणार

नक्की पाहा >> Video: आजींनी रशियन सैनिकाला भरचौकात झापलं; नंतर त्याच्या हातावर सूर्यफुलाच्या बिया टेकवत म्हटल्या, “या खिशात ठेव म्हणजे…”

या विमानाच्या दुरुस्तीसाठी तीन बिलियन अमेरिकन डॉलर्स खर्च होईल असा अंदाज आहे. तसेच हे विमान दुरुस्त करण्यासाठी बराच वेळही लागणार आहे.

किती मोठं होतं हे विमान?
सुमारे ८४ मीटर लांब, ८८ मीटर पंख आणि १८ मीटर उंच एवढे हे विमान मोठं आहे. तर एवढ्या अवाढव्य आकारामुळे आतमध्ये सुमारे ४३ मीटर लांब, ६.४ मीटर रुंद आणि ४.४ मीटर उंच एवढ्या मोठ्या आकारामध्ये विविध सामान किंवा वस्तू किंवा पेलोड ठेवता येईल एवढी जागा.

नक्की वाचा >> Ukraine War: एका बेटासाठी १३ जवान शहीद; रशियन जहाजाला पाहून म्हणाले होते “इथून…”

२५० टन एवढे वजन वाहून नेण्याची या विमानाची आश्चर्यकारक अशी क्षमता होती. या विमानाच्या क्षमतेचा अंदाज येण्यासाठी उदाहरण द्यायचं झालं तर रस्त्यावर धावणार एखादा मोठा ट्रेलर हा दहा एक गाड्या ( LMV ) वाहून नेऊ शकतो. तर एएन-२२५ विमान हे अशा ५० ( LMV ) गाड्या सहज घेऊन शकत होतं. हे विमान रशियाच्या हल्ल्यात जळून खाक झाल्याचे काही फोटो ट्विटरवरुन शेअर करण्यात आलेत.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: व्लादिमिर Vs वोलोडिमिर! युक्रेन युद्धात पुतिन यांना नडणारा ‘स्टॅण्डअप कॉमेडियन’

सर्वाधिक वजन नेण्याचा विक्रम
सप्टेंबर २००१ मध्ये चार रणगाडे घेऊन या विमानाने आकाशात झेप घेतली होती. यांचे एकूण वजन होते तब्बल २५३.८२ टन. एखाद्या विमानाने सर्वाधिक वजन वाहून नेण्याचा हा आत्तापर्यंतचा जागतिक रेकॉर्ड आहे. 

Story img Loader