युक्रेनची राजधानी कीवमध्ये किंडरगार्टनजवळ एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला. यामध्ये युक्रेनचे एक मंत्री, दोन लहान मुलांसह १६ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. युक्रेन पोलिसांचे प्रमुख इगोर क्लेमेंको यांनी सांगितलं की सध्या १६ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आमच्याकडे आहे. या १६ जणांमध्ये एक मंत्री, दोन लहान मुलं आणि सरकारमध्ये काम करणारे काही वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश आहे. डेनिस मोनास्टिसर्स्की असं मृत्यू झालेल्या मंत्र्यांचं नाव आहे असंही इगोर यांनी सांगितलं.
काय घडली घटना?
युक्रेनमध्ये एक हेलिकॉप्टर एका इमारतीला आदळलं त्यामुळे अपघात झाला. या हेलिकॉप्टरने पेट घेतला. या घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. या भयंकर अपघाताचे व्हिडिओ ट्विटरवर शेअर केले जात आहेत. डेनिस मोनास्टिसर्स्की हे युक्रेनचे गृहमंत्री होते. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.
हेलिकॉप्टरचा अपघात नेमका कसा काय झाला? ते इमारतीला कसं धडकलं हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र या अपघातात युक्रेनचे गृहमंत्री ठार झाले आहेत. ज्या ठिकाणी अपघात झाला तिथे मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.
अपघातातल्या २२ जखमींवर उपचार सुरू
कीव या ठिकाणी हा अपघात झाला आहे. या घटनेत २२ जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये १० लहान मुलांचा समावेश आहे. या जखमी मुलांवर नजीकच्या रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. डेनिस मोनोस्टिर्स्की (गृहमंत्री), येवेन येनिन आणि युरी लुबोकोचिव अशा तीन मंत्र्यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. कीवचे गव्हर्नर ओलेक्सी यांनी ही माहिती दिली की जेव्हा ही घटना घडली तेव्हा किंडरगार्टन अर्थात लहान मुलांच्या शाळेत लहान मुलं आणि इतर कर्मचारी होते. या घटनेत २२ जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये १० लहान मुलांचाही समावेश आहे. या ठिकाणी अपघात घडताच तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.
युक्रेन स्टेट इमर्न्सी सर्व्हिसचा भाग होतं हेलिकॉप्टर
ज्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला ते आपात्कालीन सेवेचा एक भाग होतं. हा अपघात नेमका का झाला ते कारण समोर येऊ शकलेलं नाही. तसंच या घटनेबाबत रशियाने काहीही वक्तव्य केलेलं नाही. युक्रेनने हा रशियाचा हल्ला असल्याचं म्हटलं आहे. या दुर्घटनेत आणखी कोण कोण ठार झालं आहे याची माहिती युक्रेन सरकारकडून घेतली जाते आहे.