सध्या संपूर्ण जगभरात रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची चर्चा आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे. युक्रेनच्या सीमेवर सुरू असलेल्या या युद्धाने आता सीमा पार केल्या आहेत. कारण दोन्ही देशांचे प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भिडल्याचं नुकतंच पाहायला मिळालं. यात दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी एकमेकांना मारहाण केली. युक्रेनचे खासदार अलेक्झांडर मारिकोव्स्की यांनी टर्कीची राजधानी अंकारा येथील एका शिखर परिषदेवेळी रशियन प्रतिनिधीला पाच-साह ठोसे मारले.

ब्लॅक सी इकोनॉमिक कोऑपरेशनच्या एका महत्त्वाच्या बैठकीदरम्यान, गुरुवारी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये हाणामारी झाली. या बैठकीला वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधी आले होते. कीव पोस्टचे एक पत्रकार जेसन जे स्मार्ट यांनी या हाणामारीचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
'Gir Mat Jaana': Viral MP Woman's Dance Fails To Impress Netizens funny video goes viral
गावच्या महिलेचा ट्रेंडिंग गाण्यावर तुफान डान्स; मारल्या अशा स्टेप की VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर

युक्रेनचे खासदार Oleksandr Marikovskyi हे त्यांच्या हातात युक्रेनचा झेंडा घेऊन उभे होते आणि लोकांशी बोलत होते. त्याचवेळी रशियाचे प्रतिनिधी तिथे आले. त्यांनी युक्रेनच्या खासदाराच्या हातातला झेंडा हिसकावला आणि तिथून निघून जात होते. त्याचवेळी मारिकोव्स्की रशियन प्रतिनिधीच्या मागे धावले आणि त्यांच्या हातातला युक्रेनचा झेंडा त्यांनी परत मिळवला. त्यावेळी दोघांमध्ये झटापट झाली. युक्रेनचे खासदार रशियन प्रतिनिधीवर भारी पडले. तेव्हा मारिकोव्स्की यांनी रशियन प्रतिनिधीला पाच ते सहा ठोसे मारत त्यांची जोरदार धुलाई केली. त्याचवेळी तिथे उपस्थित असलेले इतर लोक आणि सुरक्षारक्षकांनी मध्यस्थी करत ही हाणामारी थांबवली.

हे ही वाचा >> रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना संपवण्यासाठी युक्रेनचा ड्रोन हल्ला, VIDEO आला समोर

काळ्या समुद्राला लागून असलेल्या देशांची आर्थिक प्रगती आणि त्यांच्यामधील परस्पर सहकार्य यावर ही बैठक आयोजित केली होती. येथे मुत्सद्दी चर्चा होणं अपेक्षित होतं. परंतु याच व्यासपीठावर रशिया आणि युक्रेनमधलं युद्ध पाहायला मिळालं.