युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियाशी चर्चेपूर्वी आपण मागे हटणार नसल्याचे पुन्हा एकदा सांगितले आहे. देशाला संबोधित करताना झेलेन्स्की यांनी जर तुम्हाला मृत्यू टाळायचा असेल तर रशियात परत जा असा इशारा दिला आहे. युक्रेनियन शिष्टमंडळाने बेलारूसच्या सीमेवर रशियन प्रतिनिधींना चर्चेसाठी भेटण्याआधी झेलेन्स्की यांनी हे विधान केले आले.

रशियाने ताबडतोब युद्धविराम जाहीर करावा. तुम्ही रशियात परत जा नाहीतर तुम्हाला ठार मारले जाईल, असा इशारा झेलेन्स्की यांनी रशियन सैन्याला दिला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, युक्रेनचा प्रत्येक नागरिक हा सैनिक आहे आणि शेवटपर्यंत रशियाविरुद्ध लढेल. रशियाविरुद्धच्या लढाईत सामील होण्यास इच्छुक असलेल्या आणि लष्करी अनुभव असलेल्या कैद्यांची सुटका करण्यात येईल, असे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे.

ukraine nuclear bomb
रशिया-युक्रेन संघर्ष अणुयुद्धात बदलणार? युक्रेनची अणुबॉम्बची तयारी? काय होणार जगावर परिणाम?
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
rbi governor shaktikanta das on inflation risks and slowing growth
चलनवाढीसह विकासवेग मंदावण्याचा धोका ; शक्तिकांत दास
reality about donald trump and vladimir putin friendship
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन खरोखर एकमेकांचे मित्र आहेत का? दोघांच्या मैत्रीत युक्रेनचा ‘बकरा’?
ukraine israel war increase carbon emissions
युक्रेन, इस्रायल युद्धांमुळे कार्बन उत्सर्जनामध्ये वाढ
Maharashtra assembly elections 2024 independent candidate getting support from mahayuti maha vikas aghadi Unsatisfied leader in bhandara Vidhan sabha
भंडारा विधानसभेत अपक्ष उमेदवारांचा बोलबाला? युती-आघाडीतील असंतुष्ट अपक्षांच्या पाठिशी!
shinde shiv sena got responsibility in Maharashtra state assembly elections 2024 for pune
‘धोका’ टाळण्यासाठी ‘मित्रा’ला साकडे; महायुतीकडून शहरात एकही जागा न लढविणाऱ्या शिवसेनेची (शिंदे) यंत्रणा सक्रिय
Vladimir putin Narendra Modi Reuters
Vladimir Putin : “भारत जागतिक महासत्तांच्या यादीत हवा”, पुतिन यांची स्तुतीसुमनं; म्हणाले, “त्यांचं भविष्य…”

झेलेन्स्की माघार घेण्याच्या मनःस्थितीत नाही आणि आता ते रशियावर दबाव आणू पाहत आहेत. युक्रेनला तातडीने युरोपियन युनियनचे सदस्यत्व मिळाले पाहिजे, असे झेलेन्स्की म्हणाले. रशिया आणि युक्रेन यांच्यात लवकरच चर्चा होणार आहे. बेलारूसमध्ये दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांमध्ये ही चर्चा होणार आहे. यापूर्वी, झेलेन्स्की यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याशी झालेल्या संभाषणात पुढील २४ तास देशासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले होते. यावर ब्रिटिश पंतप्रधान म्हणाले की, रशियाच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी युक्रेनला सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करू.

बोरिस जॉन्सन व्यतिरिक्त, व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी पोलंडचे अध्यक्ष आंद्रेझ यांच्याशी देखील संवाद साधला. दरम्यान, लॅटव्हियाने युक्रेनला पाठिंबा जाहीर करणारा कायदा संसदेत मंजूर केला आहे. या अंतर्गत, देशाचा कोणताही नागरिक युक्रेनच्या वतीने रशियन सैन्याविरुद्धच्या युद्धात सामील होऊ शकतो.

दरम्यान, काही तासांपूर्वी लष्करी अधिकार्‍यांनी सांगितले की युक्रेन विरुद्ध रशियन आक्रमणाची गती मंदावली आहे. राजधानी किव्हमध्ये युक्रेनियन सैन्याकडून तीव्र प्रतिकारामुळे रशियन सैन्यावर दबाव आला आहे. रशियन सैन्याची गती कमी झाली आहे, पण तरीही काही भागात ते यश मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे सशस्त्र दलाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.