रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यान युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांत युद्धावर तोडगा काढण्यासाठी चर्चा देखील होत आहे. तिसऱ्या फेरीच्या बैठकीनंतर युक्रेनने सकारात्मक चर्चा झाल्याचं म्हटलं होतं, तर रशिया नाखुश असल्याचं दिसून आलं होतं. दरम्यान, ‘आमच्या मागण्या मान्य झाल्यास आम्ही लगेच युद्ध थांबवू,’ असं रशियाने म्हटलं होतं. त्यापैकीच एक मागणी युक्रेनच्या अध्यक्षांनी मान्य केली आहे.

पुतिन यांच्यावर अमेरिकेची मोठी कारवाई; रशियाच्या तेल आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय

‘आपण यापुढे युक्रेनच्या नेटो सदस्यत्वासाठी दबाव आणणार नाही,’ असं युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी म्हटलंय. युक्रेनने नेटो सदस्यत्वाची केलेली मागणी हे रशियाने आक्रमण करण्यामागचं एक कारण होतं.

२४ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर आक्रमण करण्यापूर्वी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी स्वतंत्र राष्ट्रे म्हणून घोषित केलेल्या डॉनेत्स्क आणि लुहान्स्क या दोन रशियन समर्थक प्रदेशांच्या स्थितीवर तडजोड करण्यास तयार असल्याचंही झेलेन्स्की म्हणाले आहेत. एबीसी न्यूजवर सोमवारी रात्री प्रसारित झालेल्या एका मुलाखतीत झेलेन्स्की म्हणाले, “नाटो युक्रेनला स्वीकारण्यास तयार नाही, हे आम्हाला समजल्यानंतर मी शांत झालो आहे. नाटो वादग्रस्त गोष्टी आणि रशियाशी संघर्षाला घाबरत आहे,” असंही झेलेन्स्की म्हणाले.

Ukraine War: “…तर हे युद्ध लगेच थांबवू’; रशियानं ठेवल्या चार अटी, युक्रेनचं संविधान बदलण्याचीही मागणी

इकोनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, नेटो सदस्यत्वाचा संदर्भ देत झेलेन्स्की म्हणाले की,”जो देश गुडघ्यावर बसून काहीतरी भीक मागत आहे, अशा देशाचा अध्यक्ष मी स्वत:ला म्हणवून घेऊ इच्छित नाही.”

Russia Ukraine War: तिसऱ्या फेरीतही तोडगा नाहीच! युक्रेन सकारात्मक; तर नाखुश रशिया म्हणतंय, “मॉस्कोच्या…”

दरम्यान, युरोपला सोव्हिएत युनियनपासून वाचवण्यासाठी शीतयुद्धाच्या सुरुवातीला तयार करण्यात आलेल्या ट्रान्साटलांटिक युती नेटोमध्ये युक्रेनने सामील होऊ नये, असे रशियाचे म्हणणे आहे.

Story img Loader