संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने रशियन बंडखोरांना ठरावाद्वारे इशारा दिल्यानंतर त्यांनी विमानाचे ब्लॅकबॉक्स मलेशियन अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले आहेत. दरम्यान एमएच १७ या विमानातील २८० प्रवाशांचे मृतदेह डच तज्ञांच्या हवाली करण्याची तयारी दर्शवली आहे. मृतदेहांनी भरलेली रेल्वे युक्रेनच्या खारकिव भागात पोहोचली आहे. हे विमान बंडखोरांनी गुरुवारी रशियाने पुरवलेल्या क्षेपणास्त्राच्या मदतीने पाडल्याचा संशय आहे.
बंडखोरांनी या घटनेनंतर सर्व मृतदेह शीतागाराची सोय असलेल्या रेल्वे डब्यातून त्यांच्या भागात नेले होते परंतु आंतरराष्ट्रीय दबाव वाढल्याने त्यांनी हे मृतदेह ताब्यात दिले आहेत. नेदरलँड्सचे जे प्रवासी होते त्यांचे मृतदेह नेदरलँड्सला नेले जाणार आहेत. याच देशाचे जास्त प्रवासी (१९३) विमानात होते. या देशानेच या विमान दुर्घटनेच्या चौकशीत पुढाकार घेतला असून या घटनेमुळे युक्रेनच्या पेचप्रसंगाची झळ आता आंतरराष्ट्रीय समुदायालाही बसली आहे.
ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथील परिस्थिती वाईट असल्याबाबत जागतिक नेत्यांनी निषेध व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय निरीक्षकांनाही सोमवारी काही मृतदेह मिळाले. बंडखोरांनी ते शीतकरण यंत्रणा असलेल्या रेल्वेच्या डब्यात ठेवले होते. उन्हाळ्यामुळे मृतदेहांची अवस्था वाईट होत चालली होती. आता ते खारकिव येथे आणण्यात आले आहेत.
त्या भागात स्थानिक शस्त्रसंधी
दरम्यान डोनेस्कचे पंतप्रधान बोरोडाइ यांनी अपघात क्षेत्राच्या १० किलोमीटर क्षेत्रात शस्त्रसंधी जारी केली असून युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी तेथील लढाई थांबवण्याचे सूचित केले आहे. या स्थानिक शस्त्रसंधीमुळे आंतरराष्ट्रीय निरीक्षकांना मोठय़ा भागाचे निरीक्षण करण्याची संधी मिळाली, फोरेन्सिक तज्ञांचाही त्यात समावेश होता. युक्रेनच्या पूर्वेला सरकारी दले व बंडखोर यांच्यात संघर्ष सुरू असून स्थानिक अधिकाऱ्यांनी डोनेस्क व ल्युगास्कला वेढा दिला आहे तेथे १० नागरिक मारले गेले आहेत.
रशियाची सैन्याची जमवाजमव
दरम्यान अजूनही तणावाची स्थिती असून कीवच्या एका अधिकाऱ्याने असा दावा केला की, रशियाने आठवडाभरात ४० हजार सैन्य सीमेवर जमवले आहे.
रशियन बंडखोरांनी पळवलेले २८० मृतदेह डच तज्ज्ञांच्या हवाली
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने रशियन बंडखोरांना ठरावाद्वारे इशारा दिल्यानंतर त्यांनी विमानाचे ब्लॅकबॉक्स मलेशियन अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-07-2014 at 02:18 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ukraine rebels release train with bodies handover black boxes from downed malaysian jet