युक्रेनमधून सुरक्षित बाहेर काढण्यात आलेल्या २१९ भारतीयांना घेऊन, मुंबईला येणारे पहिले विमान रोमानियाहून निघाले आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी सांगितले की, युक्रेनमधून बाहेर काढण्यात आलेल्या २१९ भारतीयांसह मुंबईला जाणारे पहिले विमान रोमानियाहून निघाले आहे. ते म्हणाले, ‘आम्ही प्रगती करत आहोत. आमचं पथक २४ तास कार्यरत आहे. मी वैयक्तिकरित्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. रशियन हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक अडकले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आता या सर्व भारतीयांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी सरकारने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. या लोकाना प्रथम रस्ते मार्गाने युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये पाठवले जाईल. त्यानंतर तेथून एअर इंडियाच्या विशेष विमानांनी त्यांना भारतात परत आणले जाईल. अशी पहिली निर्वासन उड्डाणे आज रोमानिया आणि हंगेरीला पाठवण्यात आली आहेत. भारताने हंगेरी, पोलंड, स्लोव्हाक प्रजासत्ताक आणि रोमानिया यांच्याशी युक्रेनच्या सीमेवरून आपल्या नागरिकांना रस्ते मार्गाने बाहेर काढण्यासाठी चर्चा केली आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी दिल्लीहून बुखारेस्टला निघालेले एअर इंडियाचे विमान रविवारी रात्री १.५० वाजता दिल्ली विमानतळावर पोहोचेल. त्याचप्रमाणे दुसरे विमान आज दुपारी ४.१५ वाजता दिल्ली विमानतळावरून निघेल आणि रविवारी सकाळी ७.४० वाजता दिल्लीला परत पोहोचेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनमधून येणारे विमान आज दिल्लीत येण्याची शक्यता खूपच कमी आहे. उद्या दिल्लीला पोहोचणाऱ्या दोन्ही विमानांमधून सुमारे ४९० प्रवाशांना दिल्लीत आणले जाणार आहे. यातील बहुतांश विद्यार्थी आहेत. तर एअर इंडियाचे विमान बुखारेस्ट, रोमानिया येथे उतरले असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

मुंबई विमानतळावर सर्व तयारी पूर्ण –

युक्रेनमधून येणाऱ्या भारतीयांसाठी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. जेणेकरून युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सहज पाठवता येईल. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे AI1944 हे विमान आज मुंबईत पोहोचत आहे. सरकारने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, विमानतळ आरोग्य संघटना (APHO) टीम विमानतळावर प्रवाशांच्या आरोग्याची तपासणी करेल. प्रवाशांना कोविड-19 लसीकरण प्रमाणपत्र किंवा नकारात्मक आरटी-पीसीआर अहवाल दाखवावा लागेल. जर कोणाकडे दोन्हीपैकी एक नसेल तर त्याची विमानतळावरच आरटी-पीसीआर चाचणी होईल. त्याचा खर्च विमानतळ उचलणार आहे. जर एखादा प्रवासी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आढळला, तर त्याच्यावर विहित कोविड प्रोटोकॉलनुसार उपचार केले जातील. याशिवाय, युक्रेनमधून मुंबईत विमानतळावर येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष बसण्याची जागा देखील निश्चित करण्यात आली आहे. त्यांना येथे मोफत वायफाय, जेवण आणि पाण्याच्या बाटल्याही दिल्या जाणार आहेत. या सर्वांना आवश्यक ती सर्व मदत मिळेल.