रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज तिसरा दिवस आहे. एकीकडे रशियन सैन्य हळुहळु पुढे सरकत युक्रेनच्या भूमीचा ताबा घेत आहे, तर दुसरीकडे युक्रेन हार पत्करायला तयार नाही. शेवटपर्यंत लढणार असल्याचे युक्रेनचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी यांनी किव्ह येथून रशियन आक्रमणाविरूद्ध राजधानीचे रक्षण करण्याचे वचन दिले आहे. रशियन सैन्य किव्ह येथे असल्याने परिस्थितीत अमेरिकेने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना किव्ह सोडण्यास सांगितले होते. पण त्यांनी अमेरिकेचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. लढा सुरु असल्याने आम्हाला शस्त्रे आणि दारूगोळा हवा आहे, असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. झेलेन्स्की यांनी रशियाच्या विरोधात ठामपणे उभे राहणार असल्याचे सांगत अमेरिकेची मदत नाकारली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी देशातील नागरिकांना शस्त्र हाती घेऊन आपल्या भूमीचे रक्षण करण्याचे आवाहन केले आहे. आपण युक्रेनमध्ये असून लोकांच्या रक्षणासाठी लढत असल्याचे सांगत त्याने व्हिडिओ जारी केला. युक्रेनमधील इतर अनेक नागरिक आणि नेत्यांनीही रशियासोबत लढण्यासाठी शस्त्रे उचलली आहेत. दरम्यान, युक्रेनच्या खासदार किरा रुडिक यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. किरा यांनी फोटो ट्विट करत युक्रेनमधील प्रत्येक स्त्री-पुरुष रशियन अत्याचारी लोकांसमोर शस्त्र उचलण्यास तयार आहे, असे म्हटले आहे. त्यांचा हा फोटो सध्या जगभर व्हायरल होत आहे.

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाने आता निर्णायक वळण घेतले आहे. एकीकडे राजधानी किव्हमध्ये रशियन सैन्य हळूहळू पुढे सरकत आहे, तर दुसरीकडे युक्रेन सरकार शरण येण्यास तयार नाही. अमेरिका आणि पाश्चात्य देश थेट लढाईत उतरले नसून युक्रेनला शस्त्रे देऊन मदत करत असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, रशियन सैन्याविरुद्धच्या लढाईत युक्रेनचे तरुण समोर आले आहेत.

त्यापैकी एक म्हणजे युक्रेनच्या खासदार किरा रुडिक आहेत. रुडिक यांचा कलाश्निकोव्ह रायफल असलेला फोटो २५ फेब्रुवारीला पोस्ट केल्यानंतर ट्विटरवर व्हायरल झाला आहे.

VIDEO :“आम्ही शस्त्रे खाली ठेवणार नाही”; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाला इशारा

एका टीव्ही चॅनलशी बोलताना किरा यांनी याबाबत भाष्य केले आहे.  “आम्ही युद्ध सुरू करणार नाही, आम्ही एक शांतताप्रिय देश आहोत. मग ते आले आहेत आणि त्यांच्यामुळे माझ्यासारखे लोक ज्यांनी शस्त्र उचलायला नको होते, ते हा शस्त्र हातात घेत आहेत. आम्ही ज्यावर विश्वास ठेवतो त्यासाठी लढण्यास तयार आहोत.  इतरांकडून काहीतरी जिंकण्यासाठी आणि बळकावण्यासाठी नाही तर आपले स्वातंत्र्य, आपले लोक, आपल्या राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी आहे,” असे किरा रुडिक यांनी म्हटले आहे.