युक्रेनच्या लष्कराने खर्किव्हच्या आकाशात घिरट्या घालणाऱ्या रशियन एअरफोर्सच्या विमानाला पाडल्याचा दावा केलाय. या हल्ल्यामध्ये वैमानिकाचा मृत्यू झाल्याची माहिती खर्किव्हमधील संरक्षणदलाच्या मुख्यालयाने दिलीय.युक्रेन लष्कराने केलेल्या हल्ल्यादरम्यान रशियन वैमानिकाला विमानाबाहेर निघण्यासाठी म्हणजेच इजेक्ट होण्यासाठीही वेळ मिळाला नाही आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. (युद्धाचे लाइव्ह अपडेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा)
नक्की पाहा >> Photos: युक्रेनमध्ये शिरलेल्या रशियन तोफा, गाड्यांवर Z, O, X, V अक्षरं का लिहिली आहेत? त्यांचा अर्थ काय?
रशियाचं हे विमान कुलिनीचीव येथे पडल्याची माहिती खर्किव्हच्या स्थानिक प्रशासने दिलीय. हे रशियन विमान खर्किव्हमधील बालाकिरेव या नागरी वस्तीच्या परिसरामध्ये आकाशात घिरट्या घालत असताना हा हल्ला कऱण्यात आला. एसयू-२५ प्रकारचं हे विमान असल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी रशियन हवाईदलाने विनितसिया आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बने अनेकदा हल्ले केल्यानंतर या हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी रविवारी सायंकाळी हे विमान युक्रेननं पाडल्याचं सांगितलं जातंय.
नक्की वाचा >> Ukraine War: “माझ्यासोबत बसा, आपण अगदी…”; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी पुतिन यांना सुचवला ‘युद्ध संपवण्याचा एकमेव मार्ग’
रविवारी रशियन संरक्षण मंत्रालयाने खेरसन जवळल्या युक्रेनियन तळावर रशियाने ताबा मिळवल्याचं सांगितलं होतं. रशियन संरक्षण दलाने केलेल्या दाव्यानुसार युक्रेनमधील २ हजार २०३ लष्करी इमारती उद्धवस्त करण्यात आल्यात. त्याचप्रमाणे युक्रेनचे ७७८ टँक्स आणि २७९ वाहने तसेच दारुगोळ्यासंदर्भातील बांधकाम उद्धवस्त करण्यात आलंय.
नक्की पाहा >> देशाचं नाव चुकीचं घेतल्यानं नारायण राणे ट्रोल; मुंबई विमानतळावरील व्हिडीओ झाला व्हायरल
दरम्यान, रशियाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या तरच युक्रेनवरील लष्करी कारवाई थांबवण्यात येईल, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी रविवारी सांगितले. पाश्चिमात्य देशांनी रशियावर लादलेल्या आर्थिक निर्बंधांची तुलना त्यांनी युद्धाशी केली. दुसरीकडे युक्रेनवर उड्डाण प्रतिबंधित क्षेत्र (नो-फ्लाय झोन) लागू करावे असे आवाहन त्या देशाचे अध्यक्ष वोल्दिमिर झेलेन्स्की यांनी परराष्ट्रांना केले आहे.
नक्की वाचा >> Ukraine War: “या गुलाबाच्या फुलाचं काय करु? त्यापेक्षा…”; युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्याची केंद्र सरकारवर टीका
रशियन सैन्याने वेढा दिलेल्या मारियुपोल या बंदरांच्या शहरामध्ये युद्धविराम पाळण्याचा दुसरा प्रयत्नही रविवारी फोल ठरला. युद्धग्रस्त भागातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी कॉरिडॉर तयार करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. याचे खापर रशियन समर्थक फुटीरतावादी आणि युक्रेनचे लष्कर यांनी एकमेकांवर फोडले. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून आजपर्यंत तो देश सोडणाऱ्यांची संख्या सुमारे १५ लाखांहून अधिक झाली आहे. युक्रेनच्या नागरिकांनी युरोपातील शेजारी राष्ट्रांमध्ये आश्रय घेतला आहे.