युक्रेनमधील वैद्यकीय शिक्षण घेणाऱया दोन भारतीय विद्यार्थ्यांची रविवारी रात्री हत्या करण्यात आली. तर एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
मुझफ्फरनगरचा प्रणव शैंडिल्य आणि गाझियाबादच्या अंकुर सिंग या दोन विद्यार्थ्यांची युक्रेनमध्ये हत्या करण्यात आली. तर जखमी झालेल्या विद्यर्थ्याचे नाव इंद्रजित सिंग चौहान असून तो मूळ आग्र्याचा आहे. त्याच्यावर युक्रेनमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
युक्रेनच्या वैद्यकीय कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱया तीन भारतीय विद्यार्थ्यांवर रविवारी मध्यरात्री हल्ला करण्यात आला. यात दोघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे. घडलेल्या घटनेची युक्रेन पोलीस, विद्यापीठातील सहकारी आणि स्थानिकांकडून माहिती घेतली जात आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी सांगितले.

Story img Loader