रशियाने युक्रेनविरोधात पुकारलेल्या युद्धाच्या सहाव्या दिवशी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. यासंदर्भातील माहिती परराष्ट्र मंत्रालयानेच दिली आहे. सलग सहाव्या दिवशी रशियाकडून युक्रेनवर हवाई हल्ले सुरुच आहे. त्यातच आज या शहरामध्ये रशियन लष्कराने सर्वामान्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. याच गोळीबारामध्ये किराणामाल घेण्यासाठी हॉस्टेल बंकरमधून बाहेर पडलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. या विद्यार्थ्याची ओळखही पटलीय. तसेच नक्की काय घडलं याबद्दलची माहिती समोर आलीय.

नक्की पाहा >> Video: “मोदीजी एक महिना तुम्ही युपी इलेक्शनमध्ये व्यस्त होता, बायडेन यांना…”; युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थिनीचा प्रश्न

परराष्ट्र मंत्रालयाने काय सांगितलं?
परराष्ट्र मंत्रालयाने आज सकाळी खार्कीव्हवर रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याचं सांगितलंय. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंधम बागची यांची ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिलीय. दोन ट्विट करत त्यांनी याबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी, “अत्यंत दु:खाने आम्ही या वृत्ताला दुजोरा देत आहोत की एका भारतीय विद्यार्थ्याचा खार्कीव्ह येथे आज सकाळी झालेल्या हवाई हल्ल्यात मृत्यू झालाय. परराष्ट्र मंत्रालय या विद्यार्थ्याच्या कुटुबाच्या संपर्कात आहे,” असं म्हटलंय.

Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh
Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांचा मोठा खुलासा, “त्यादिवशी आरोपी आणि एपीआयचं चहाचं बिल मीच दिलं, त्यानंतर त्याने…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Mallikarjun Kharge Dubki Remark
Mallikarjun Kharge : “गंगेत डुबकी घेतल्याने गरिबी…”, मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानावरून नवा वाद; भाजपाने दिलं प्रत्युत्तर
Loksatta readers reactions on lokrang article
पडसाद : दबंग, पण सहृदयी अधिकारी
russia ukraine war
Russia Ukraine War : युद्ध थांबविण्यासाठी झेलेन्स्की तयार
trump warns Russia marathi news
Donald Trump : रशियावर निर्बंध लादण्याचा ट्रम्प यांचा इशारा
Donald Trump Speech
Donald Trump : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच भाषणात जीवघेण्या हल्ल्याचा उल्लेख, “देवाने मला वाचवलं कारण..”
Greeshma Poisoning Case Verdict
Greeshma Poisoning Case Verdict: विष देऊन बॉयफ्रेंडला मारलं; न्यायालयानं गर्लफ्रेंडला सुनावली मृत्यूदंडाची शिक्षा, मन सुन्न करणारी क्राइम स्टोरी

नक्की वाचा >> “आमच्याशी भारत सरकारचा संपर्क झाला ही अफवा”; युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या विद्यार्थ्यानं सांगितली सत्य परिस्थिती

परराष्ट्र मंत्रालयाने आज सकाळी खार्कीव्हवर रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याचं सांगितलंय. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंधम बागची यांची ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिलीय. दोन ट्विट करत त्यांनी याबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी, “अत्यंत दु:खाने आम्ही या वृत्ताला दुजोरा देत आहोत की एका भारतीय विद्यार्थ्याचा खार्कीव्ह येथे आज सकाळी झालेल्या हवाई हल्ल्यात मृत्यू झालाय. परराष्ट्र मंत्रालय या विद्यार्थ्याच्या कुटुबाच्या संपर्कात आहे,” असं म्हटलंय.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: कोणी म्हणतंय हिटलर तर कोणी म्हणतंय नरकात जळणार; जगभरातील Anti-Putin मोर्चांमधील पोस्टर्स पहिलेत का?

परराष्ट्र मंत्रालयाचे परराष्ट्र सचिवांनी रशिया आणि युक्रेनमधील राजदूतांना फोनवरुन संपर्क केला आहे. भारतीयांना या युद्धग्रस्त शहरांमधून बाहेर काढण्यासाठी तातडीने सेफ पॅसेज उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी भारताकडून करण्यात आलीय, असंही बागची म्हणालेत.

नक्की पाहा >> Video: रणगाडा बंद पडल्याने अडून पडलेल्या रशियन सैनिकांजवळ येऊन युक्रेनियन चालक म्हणाला, “मी तुम्हाला…”

कोण आहे हा मुलगा?
खार्कीव्हमधील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये हा विद्यार्थी शिकत असल्याची माहिती समोर आलीय. मरण पावलेल्या मुलाचं नाव नवीन शेखरप्पा गायनागोदर असं असून तो वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या चौथ्या वर्षाला शिकत होता. हा विद्यार्थी मुळचा कर्नाटकचा होता. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी नवीनचा मृतदेह भारतात आणण्यासाठीचे प्रयत्न सुरु असल्याचं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> Ukraine War: पुतिन यांना मोठा धक्का! झेलेन्स्कींच्या हत्येसाठी पाठवलेल्या ‘चेचेन स्पेशल फोर्स’चा युक्रेनकडून खात्मा

नेमकं घडलं काय?
इंडियन एक्सप्रेसशी बोलताना युक्रेनमधील दुसरं सर्वात महत्वाचं शहर असणाऱ्या खार्कीव्हमधील हॉस्टेल बंकरमध्ये अडकून पडलेल्या या मरण पावलेल्या विद्यार्थ्यासोबत राहणाऱ्या विद्यार्थ्याने नक्की काय घडलं याबद्दलची सविस्तर माहिती दिलीय. मूळ चेन्नईचा असणारा श्रीधरनने गोपालकृष्णन् हा नवीनचा हॉस्टेलमधील मित्र आहे. नवीनसोबत आज सकाळी नक्की काय घडलं याबद्दल त्याने सविस्तर माहिती दिलीय.

नक्की पाहा हा व्हिडीओ >> CCTV Video: युक्रेनमधील दुसऱ्या सर्वात मोठ्या शहरातील मुख्य सरकारी इमारतीवर रशियाने टाकलं क्षेपणास्त्र

तो किराणामालासाठी रांगेत उभा होता अन्…
“नवीनला युक्रेनमधील स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेदहाच्या सुमारास गोळ्या घालून ठार करण्यात आलं. तो किराणामालाच्या दुकानासमोर उभा होता अन् तितक्यात तिथं रशियन लष्कराने लोकांवर गोळीबार सुरु केला. त्यातच नवीनचा मृत्यू झाला,” असं श्रीधरन म्हणालाय.

नक्की पाहा हा व्हिडीओ >> Viral Video: युक्रेनच्या शेतकऱ्याकडून रशियन लष्कराचा टप्प्यात कार्यक्रम; ट्रॅक्टरला रणगाडा बांधला अन्…

मृतदेहाबद्दल काहीच माहिती नाही
“त्याच्या मृतदेहाबद्दल आम्हाला काहीही माहिती मिळा नाहीय. आमच्यापैकी कोणालाही रुग्णालयामध्ये जाता आलं नाही. कदाचित त्याचा मृतदेह तिथे ठेवला असेल,” असं श्रीधरनने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलंय.

Story img Loader