रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरु असणाऱ्या युद्धामध्ये रशियन सैन्याकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. सहाव्या दिवशी नवीन शेखरप्पा गायनागोदर नावाच्या कर्नाटकमधील भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. यासंदर्भातील माहिती परराष्ट्र मंत्रालयानेच दिली आहे. मात्र भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर भारताने रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी संपर्क साधला असून एक महत्वाची मागणी या देशांकडे केलीय. भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या वृत्तानंतर लगेचच या दोन्ही युद्धगस्त देशांमध्ये भारतातून फोनाफोनी झाल्याची माहिती सरकारच्यावतीने परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंधम बागची यांनी दिलीय.

नक्की पाहा >> Photos: युक्रेनची भावनिक साद, पुतिन यांना रोकठोक प्रश्न अन् मोठं Standing Ovation; पाहा घडलं काय

नक्की वाचा >> Ukraine War: उच्चस्तरीय बैठकीनंतर मोदींचे युक्रेनच्या शेजारी देशांतील पंतप्रधानांना फोन; म्हणाले, “पुढील काही दिवस…”

कोणाचा मृत्यू झाला?
सलग सहाव्या दिवशी रशियाकडून युक्रेनवर हवाई हल्ले सुरुच आहे. त्यातच आज या शहरामध्ये रशियन लष्कराने सर्वामान्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. याच गोळीबारामध्ये किराणामाल घेण्यासाठी हॉस्टेल बंकरमधून बाहेर पडलेल्या नवीनचा मृत्यू झाला. नवीन वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या चौथ्या वर्षाला शिकत होता. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी नवीनचा मृतदेह भारतात आणण्यासाठीचे प्रयत्न सुरु असल्याचं म्हटलं आहे.

ukraine nuclear bomb
रशिया-युक्रेन संघर्ष अणुयुद्धात बदलणार? युक्रेनची अणुबॉम्बची तयारी? काय होणार जगावर परिणाम?
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
reality about donald trump and vladimir putin friendship
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन खरोखर एकमेकांचे मित्र आहेत का? दोघांच्या मैत्रीत युक्रेनचा ‘बकरा’?
amol kolhe bag checked after uddhav thackeray
उद्धव ठाकरेंनंतर महाविकास आघाडीच्या आणखी एका नेत्याच्या बॅगची तपासणी, नेमकं काय घडलं?
eknath shinde challenge to mahavikas aghadi,
“तुम्ही अडीच वर्षांत काय केलं? समोरासमोर येऊन चर्चा करा”; एकनाथ शिंदेंचं महाविकास आघाडीला थेट आव्हान!
Vladimir putin Narendra Modi Reuters
Vladimir Putin : “भारत जागतिक महासत्तांच्या यादीत हवा”, पुतिन यांची स्तुतीसुमनं; म्हणाले, “त्यांचं भविष्य…”
Vasai alarm ATM center, alarm ATM, Vasai,
एटीएम केंद्रातील अलार्मचा ५ तास नागरिकांना मनस्ताप
pm narendra modi donald trump
“माझे मित्र…”, नरेंद्र मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनकॉलनंतर सोशल पोस्ट; म्हणाले…

नक्की पाहा >> Video: “मोदीजी एक महिना तुम्ही युपी इलेक्शनमध्ये व्यस्त होता, बायडेन यांना…”; युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थिनीचा प्रश्न

परराष्ट्र मंत्रालयाने काय सांगितलं?
परराष्ट्र मंत्रालयाने आज सकाळी खार्कीव्हवर रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याचं सांगितलंय. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंधम बागची यांची ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिलीय. ट्विट करत त्यांनी याबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी, “अत्यंत दु:खाने आम्ही या वृत्ताला दुजोरा देत आहोत की एका भारतीय विद्यार्थ्याचा खार्कीव्ह येथे आज सकाळी झालेल्या हवाई हल्ल्यात मृत्यू झालाय. परराष्ट्र मंत्रालय या विद्यार्थ्याच्या कुटुबाच्या संपर्कात आहे,” असं म्हटलंय.

नक्की वाचा >> Ukraine War: “पंतप्रधान मोदी हिंमत दाखवून पुतिन यांना…”; भाजपा खासदाराने निशाणा साधत विचारला प्रश्न

नक्की पाहा हा व्हिडीओ >> CCTV Video: युक्रेनमधील दुसऱ्या सर्वात मोठ्या शहरातील मुख्य सरकारी इमारतीवर रशियाने टाकलं क्षेपणास्त्र

भारताने केली महत्वाची मागणी…
परराष्ट्र मंत्रालयाचे परराष्ट्र सचिवांनी रशिया आणि युक्रेनमधील राजदूतांना फोनवरुन संपर्क केला आहे. तातडीने या युद्धग्रस्त शहरांमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी सेफ पॅसेज उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी भारताकडून करण्यात आलीय, असंही बागची म्हणालेत. तसेच रशिया आणि युक्रेनमधील भारतीय दुतावासाकडूनही या सेफ पॅसेजसाठी मागणी करण्यात येणार असल्याचं बागची यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मरण पावलेल्या मुलाच्या वडिलांचं केलं सांत्वन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युक्रेनमध्ये मरण पावलेल्या नवीनच्या वडिलांना फोन करुन त्यांचं सांत्वन केलं. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलंय.

नक्की पाहा हा व्हिडीओ >> Viral Video: युक्रेनच्या शेतकऱ्याकडून रशियन लष्कराचा टप्प्यात कार्यक्रम; ट्रॅक्टरला रणगाडा बांधला अन्…

८००० हजार भारतीय परतले…
स्थलांतर मोहिमेचा भाग म्हणून सोमवारपर्यंत १३९६ भारतीय नागरिकांना सहा विमानांतून देशात परत आणण्यात आले असून, भारताने या महिन्यात यापूर्वी पहिली सूचनावली जारी केल्यापासून युक्रेनमधून बाहेर पडलेल्या भारतीयांची एकूण संख्या सुमारे ८००० झाली आहे. भारतीय विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यास आणि त्यांना परत आणण्यास सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले आहे.

मोदी-पुतिन चर्चा…
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यामध्ये फोनवरुन युक्रेनमधील सर्व घडामोडींबद्दल गुरुवारी (२४ फेब्रुवारी २०२२ रोजी) रात्री उशीरा चर्चा झाल्याची माहिती भारताच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिली होती. यावेळी पुतिन यांनी सध्या घडलेल्या घडामोडींबद्दल पंतप्रधान मोदींना सविस्तर माहिती दिली. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी, ‘रशियाचे ‘नाटो’शी असलेले मतभेद चर्चेतूनच सोडविता येऊ शकतात,’ या भूमिकेचा पुनरूच्चार करून हिंसाचार थांबविण्याचे आवाहन पुतिन यांना केलं होतं