युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकून पडलेले हजारो भारतीय विद्यार्थी मायदेशी परत येण्यासाठी धडपडत असतानाच दुसरीकडे युक्रेनमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी युक्रेनमध्ये गेलेल्या एका भारतीय तरुण युक्रेनियन लष्कराच्या बाजूने युद्धभूमीत लढतोय. विऑन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार या २१ वर्षीय विद्यार्थ्याचं नाव सैनिकेश रविचंद्रन असं आहे.

नक्की वाचा >> Ukraine War: “मी मेलो तरी…”; पाळीव बिबट्या, ब्लॅक पँथरला युक्रेनमध्ये सोडून येण्यास भारतीयाचा नकार

समोर आलेल्या माहितीनुसार युक्रेनसाठी लढणाऱ्या जॉर्जियन नॅशनल लीजन या लष्करी तुकडीमध्ये रविचंद्रन सहभागी झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आपला मुलगा असं काही करेल यावर त्याच्या कुटुंबियांचा विश्वास बसत नाहीय. तामिळनाडूमधील कोइम्बतूर येथील रविचंद्रन हा युक्रेनमधील खार्किव्हमध्ये शिक्षण घेतोय. येथील नॅशनल एरोस्पेस युनिव्हर्सिटीमध्ये तो शिकत होता. मात्र युद्ध सुरु झाल्यापासून सर्वच यंत्रणा कोलमडून पडल्याने अनेक विद्यार्थ्यांप्रमाणे तो सुद्धा अडकून पडला. मात्र विद्यापिठात अभ्यासक्रमाच्या पाचव्या वर्षाला असणाऱ्या रविचंद्रनने युक्रेनच्या लष्करी तुकडीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेत शस्त्र हाती घेतलं आहे. त्याचा युक्रेनच्या लष्करी तुकडीतील जवानांसोबतचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Loksatta balmaifal The fun of sharing kid moral story
बालमैफल : शेअरिंगची गंमत
Padmashri Physicist Dr Rohini Godbole Memoirs by Researcher Dr Radhika Vinze
विज्ञानव्रती
smriti irani in Vasai Assembly constituency for Maharashtra Assembly Election 2024
वसईची परिस्थिती जैसे थे; स्मृती इराणी, महायुतीच्या प्रचारासाठी वसईत सभा
AMU minority status upheld 1967 decision quashed by Supreme Court
‘एएमयू’चा अल्पसंख्याक दर्जा कायम, १९६७ चा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द; नियमित खंडपीठात सुनावणी
Supriya Sule asked why the investigative agencies are misusing power
सत्तेचा गैरवापर करून तपास यंत्रणांचा ससेमिरा कशासाठी; सुळे यांचा सवाल
Mankhurd  Shivajinagar Muslim community in confusion print politics news
मानखुर्द- शिवाजीनगरात मुस्लीम समाज संभ्रमात

नक्की पाहा >> Photos: युक्रेनमध्ये शिरलेल्या रशियन तोफा, गाड्यांवर Z, O, X, V अक्षरं का लिहिली आहेत? त्यांचा अर्थ काय?

यासंदर्भात त्याच्या आईशी विऑन न्यूजने संपर्क केला असता त्यांनी आपला मुलगा असं पाऊल उचलेलं याची कल्पना नव्हती असं म्हटलंय. तसेच पाच दिवसांपूर्वी त्याचं आमच्याशी बोलणं झालं होतं, असंही त्याच्या आईने सांगितलं. रविचंद्रनने घेतलेल्या या निर्णयामुळे त्याचे कुटुंबिय त्याच्यावर चांगलेच संतापले असून ते मुलाच्या या निर्णयामुळे चिंतेत आहेत. “मागील पाच दिवसांपासून त्याच्याशी आमचा संपर्क होऊ शकलेला नाही,” असंही त्याच्या आईने म्हटलंय.

नक्की वाचा >> Ukraine War: दोघांचं भांडण चीनचा लाभ! निर्यात भरमसाठ वाढली, आकडेवारी पाहून थक्क व्हाल

सध्या आपण त्याच्याबद्दल फार माहिती देऊ शकत नाही. घरी सर्वजण त्याची फार चिंता करतायत, असंही त्याच्या आईने स्पष्ट केलं आहे. युक्रेनच्या लष्करामध्ये सहभागी होण्यासाठी पोर्तुगाल, ब्राझीलसारख्या देशांमधूनही अनेकजण पोलंडमार्गे युक्रेनमध्ये दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. युक्रेनमधील लष्कराच्या हवाल्याने खर्किव्ह इंडिपेंडण्टने दिलेल्या माहितीनुसार अमेरिका, ब्राझील, पोर्तुगाल, युनायटेड किंग्डम, लिथुआनिया, मॅक्सिको आणि भारतीय नागरिक स्वइच्छेने युक्रेनच्या लष्करी तुकड्यांमध्ये भरती होत आहेत.

नक्की पाहा >> देशाचं नाव चुकीचं घेतल्यानं नारायण राणे ट्रोल; मुंबई विमानतळावरील व्हिडीओ झाला व्हायरल

नक्की वाचा >> Ukraine War: “या गुलाबाच्या फुलाचं काय करु? त्यापेक्षा…”; युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्याची केंद्र सरकारवर टीका

काही दिवसांपूर्वीच केंद्रीय तपास यंत्रणांनी त्याच्या पालकांकडे याबद्दल चौकशी केलीय. त्याला युक्रेनियन लष्कराच्या तुकडी सहभागी व्हावसं वाटण्यामागील कारणं काय असू शकतात याबद्दल चौकशी करण्यात आल्याचं स्थानिक कोइम्बतूरमधील थुडालियुर येथील पोलीस निरिक्षकांनी सांगितलं आहे. रविचंद्रनसंदर्भात सविस्तर माहिती गोळा करुन आम्ही अहवाल केंद्रीय यंत्रणांना सादर करणार आहोत असं निरिक्षकांनी सांगितलंय.