युक्रेनमधील खार्कीव्ह शहरामध्ये अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांनी भारतीय अधिकाऱ्यांचा आमच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क झालेला नसल्याचं म्हटलं आहे. विद्यार्थ्यांशी आमचा संपर्क झाल्याचा सरकारी अधिकाऱ्यांचा दावा अफवा असल्याचं युक्रेनमधील विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना युक्रेनमधील दुसरं सर्वात महत्वाचं शहर असणाऱ्या खार्कीव्हमधील हॉस्टेल बंकरमध्ये अडकून पडलेल्या विद्यार्थ्याने तेथील सत्य परिस्थिती सांगितलीय.

नक्की वाचा >> Ukraine War: एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू; रशियन सैनिकांनी खार्कीव्हमध्ये केलेल्या गोळीबारात गमावले प्राण

खार्कीव्हमधील बंकरमध्ये अडकून पडलेल्यांपैकी श्रीधरन गोपालकृष्णन् या विद्यार्थ्याने इंडियन एक्सप्रेशशी बोलताना आमच्याशी आतापर्यंत कोणीही संपर्क केलेला नाही असं म्हटलंय. मूळ चेन्नईचा असणाऱ्या श्रीधरनने आम्ही सर्वजण आता हॉस्टेलमधील बंकरमध्ये लपलो आहोत असं सांगितलंय. मात्र आम्हाला येथून कसं बाहेर काढण्यात येणार हे अद्याप आम्हाला ठाऊक नसल्याचंही त्याने म्हटलंय. “त्या केवळ अफवा आहे, भारतीय अधिकाऱ्यांकडून अद्याप आमच्याशी कोणताही संपर्क साधण्यात आलेला नाहीय,” असं श्रीधरनने स्पष्ट शब्दा सांगितलंय.

international-space-station-seen-in-indian-skies
Video: पुणे-मुंबईतून आकाशात दिसलं दुर्मिळ दृश्य; कोणत्याही दुर्बिणीशिवाय पाहायला मिळालं आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक!
couple Decampsa
माणुसकीला काळीमा : पतीला किडनी विकायला लावून पत्नीचं…
uddhav thackeray on nirmala sitharaman budget 2025
12 Lakh Income Tax: ‘एका सामान्य कुवतीच्या महिलेने…’, निर्मला सीतारमण यांचा उल्लेख करत ठाकरे गटाची टीका; १२ लाखांच्या मुद्द्यावर मांडली भूमिका!
Amrut Snan on Vasant Panchami
Mahakumbh Mela 2025 : मौनी अमावस्येच्या चेंगराचेंगरीनंतर वसंत पंचमीसाठी उत्तर प्रदेश सरकारची चोख व्यवस्था; ‘एवढ्या’ कोटी भाविकांचं अमृतस्नान!
no alt text set
‘इस्रो’च्या १००व्या मोहिमेला धक्का; ‘एनव्हीएस०२’ उपग्रहामध्ये तांत्रिक अडथळे, भारतीय उपग्रह प्रक्षेपण, इस्रो मिशन अपयश,
Karnataka Congress differences news in marathi
कर्नाटक काँग्रेसमधील मतभेद उघड ; मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सल्लागाराचा राजीनामा
veteran actor amol palekar remark in jaipur literature festival 2025
जयपूर साहित्य महोत्सव :सध्या सरकारविरोधात जो बोलतो तो देशद्रोही; अमोल पालेकर यांचे परखड मत
SC to hear plea seeking safety measures for devotees at Mahakumbh on Feb 3
कुंभमेळ्यासंबंधी याचिकांवर आज सुनावणी
President donald Trump Imposes tariffs hike on china canada and mexico
व्यापारयुद्धाचे रणशिंग; चीन, कॅनडा, मेक्सिकोवर ट्रम्प प्रशासनाचा वाढीव कर; शेजारी देशांचे अमेरिकेला जशास तसे उत्तर

नक्की पाहा हा व्हिडीओ >> CCTV Video: युक्रेनमधील दुसऱ्या सर्वात मोठ्या शहरातील मुख्य सरकारी इमारतीवर रशियाने टाकलं क्षेपणास्त्र

श्रीधरनने त्यांच्या एका सहकाऱ्याचा मृत्यू झाल्याचंही म्हटलं आहे. मरण पावलेल्या मुलाचं नाव नवीन शेखरप्पा गायनागोदर असं असून तो वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या चौथ्या वर्षाला शिकत होता. “नवीनला युक्रेनमधील स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेदहाच्या सुमारास गोळ्या घालून ठार करण्यात आलं. तो किराणा मालाच्या दुकानासमोर उभा होता. तेव्हा रशियन लष्कराने लोकांवर गोळीबार सुरु केला. त्याच्या मृतदेहाबद्दल आम्हाला काहीही माहिती नाहीय. आमच्यापैकी कोणालाही रुग्णालयामध्ये जाता आलं नाही. कदाचित त्याचा मृतदेह तिथे ठेवला असेल,” असं श्रीधरनने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलंय.

परराष्ट्र मंत्रालयाने आज सकाळी खार्कीव्हवर रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याचं सांगितलंय. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंधम बागची यांची ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिलीय. ट्विट करत त्यांनी याबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी, “अत्यंत दु:खाने आम्ही या वृत्ताला दुजोरा देत आहोत की एका भारतीय विद्यार्थ्याचा खार्कीव्ह येथे आज सकाळी झालेल्या हवाई हल्ल्यात मृत्यू झालाय. परराष्ट्र मंत्रालय या विद्यार्थ्याच्या कुटुबाच्या संपर्कात आहे,” असं म्हटलंय.

किव्ह आणि खार्कीव्हमध्ये संघर्ष…
किव्ह आणि खार्कीव्ह या पूर्वेकडील प्रमुख शहरांवर ताबा मिळवण्यासाठी रशियन लष्कराकडून मागील काही दिवसांपासून प्रयत्न सुरु आहेत. मागील आठवड्यामध्ये रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केली. त्यानंतर सुरु असणाऱ्या संघर्षामध्ये रशियन सैन्याचीही आता दमछाक होताना दिसतेय. तरीही रशियन हवाईदलाच्या माध्यमातून बॉम्ब वर्षाव सुरु आहे. असाच एक हल्ला आज म्हणजेच युद्धाच्या सहाव्या दिवशी रशियाने खार्कीव्हच्या मुख्य सरकारी इमारतीवर केलाय. शहरामधील मुख्यचौकात क्षेपणास्त्राने मारा करण्यात आल्याचा सारा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.

Story img Loader