युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारने वेगाने हलचाली सुरु केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दिल्लीमध्ये याच विषयावर एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीमध्ये चार केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनच्या आसपासच्या देशांमध्ये पाठवण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतीयांच्या देशात स्थलांतराच्या प्रक्रियेच्या समन्वयासाठी चार केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या बैठकीनंतर सोमवारी रात्री उशीरा पंतप्रधान मोदींनी युक्रेनमधून भारतीयांना बाहेर पडण्यासाठी मदत करुन आश्रय देणाऱ्या युक्रेन शेजराच्या देशांच्या पंतप्रधानांशी फोनवरुन चर्चा करुन त्यांचे आभार मानले.

नक्की वाचा >> Ukraine War: “पंतप्रधान मोदी हिंमत दाखवून पुतिन यांना…”; भाजपा खासदाराने निशाणा साधत विचारला प्रश्न

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोणते मंत्री जाणार परदेशात?
मोदींनी घेतलेल्या बैठकीमध्ये हरदीप पुरी, ज्योतिरादित्य शिंदे, किरेन रिजिजू आणि व्ही.के. सिंह हे चार केंद्रीय मंत्री भारताचे ‘विशेष दूत’ म्हणून जाणार असल्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिलीय. शिंदे हे रुमानिया व मोल्दोवातून होणाऱ्या स्थलांतराच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवतील, तर रिजिजू हे स्लोव्हाकिया येथे तळ ठोकतील. पुरी हे हंगेरीला जातील, तर पोलंडमधील व्यवस्थेची जबाबदारी व्ही.के. सिंह यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

नक्की पाहा >> Video: “मोदीजी एक महिना तुम्ही युपी इलेक्शनमध्ये व्यस्त होता, बायडेन यांना…”; युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थिनीचा प्रश्न

रुमानियाच्या पंतप्रधानांना कॉल करुन मानले आभार…
पंतप्रधान मोदींनी रुमानियाचे पंतप्रधान निकोले-इओनेल सिउका यांनाही फोन करुन त्यांचे आभार मानले. युक्रेनमधून भारतीयांना परत आणण्यासाठी रुमानियाकडून केल्या जाणाऱ्या मदतीसाठी मोदींनी आभार व्यक्त केलं. व्हिजाशिवाय भारतीय नागरिकांना देशामध्ये प्रवेश देण्याचा निर्णय रुमानियन सरकारने घेतल्याबद्दल मोदींनी आभार व्यक्त केले. तसेच भारताला विशेष विमानांनी भारतीय नागरिकांना परत मायदेशी नेण्यासाठी विमानतळं आणि उड्डाणे करण्यासाठीची सोय उपलब्ध करुन दिल्याबद्दलही मोदींनी निकोले-इओनेल सिउका यांना धन्यवाद म्हटल्याचं एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटलंय.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: कोणी म्हणतंय हिटलर तर कोणी म्हणतंय नरकात जळणार; जगभरातील Anti-Putin मोर्चांमधील पोस्टर्स पहिलेत का?

शिंदेकडे जबाबदारी सोपवल्याची दिली माहिती…
यावेळी पंतप्रधान मोदींनी निकोले-इओनेल सिउका यांना भारताचे नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना रुमानियामधून भारतीयांना मायदेशी आणण्यासंदर्भातील मोहिमेसाठी नियुक्त करण्यात आल्याची माहितीही दिली. पुढील काही दिवस शिंदे हेच स्थानिक प्रशासनासोबत रुमानियामधून भारतीयांना परत आणण्यासंदर्भातील नियोजन पाहतील असं पंतप्रधान मोदींनी सिउका यांना कळवल्याचं पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केलंय.

नक्की पाहा >> Video: रणगाडा बंद पडल्याने अडून पडलेल्या रशियन सैनिकांजवळ येऊन युक्रेनियन चालक म्हणाला, “मी तुम्हाला…”

मोदींनी स्लोव्हाकियाच्या पंतप्रधानांनाही केला कॉल …
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी रात्री स्लोव्हाकियाचे पंतप्रधान एडवर्ड हिजेर यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. युक्रेनमधून भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी स्लोव्हाकियाकडून जी मदत केली जात आहे त्यासाठी पंतप्रधान मोदींनी एडवर्ड यांचे आभार मानले. तसेच, “स्लोव्हाकियाने पुढील काही दिवस अशाच प्रकारे सहकार्य करावं,” अशी विनंतीही पंतप्रधान मोदींनी केल्याचं पंतप्रधान कार्यालयाकडून दिलेल्या माहितीत सांगण्यात आलंय.

नक्की वाचा >> Ukraine War: पुतिन यांना मोठा धक्का! झेलेन्स्कींच्या हत्येसाठी पाठवलेल्या ‘चेचेन स्पेशल फोर्स’चा युक्रेनकडून खात्मा

मोदींनी व्यक्त केलं दुख:…
मोदींनी युक्रेन शेजारच्या राष्ट्रांच्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करताना तेथे युद्धामुळे निर्माण झालेल्या मानवी जिवनाशी संबंधित समस्या आणि हिंसेबद्दल दुख: व्यक्त केलंय. संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यासंदर्भातील उल्लेखही मोदींनी यावेळी केला. देशांचे सार्वभौमत्व आणि सीमांचा सन्मान करणं गरजेचं आहे असंही यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाल्याचे पंतप्रधान कार्यालायकडून सांगण्यात आलंय.

नक्की वाचा >> Ukraine War : युक्रेनच्या मदतीसाठी युरोपीयन महासंघाचा ऐतिहासिक निर्णय; म्हणाले, “पहिल्यांदाच आम्ही हल्ला झालेल्या…”

८००० हजार भारतीय परतले…
स्थलांतर मोहिमेचा भाग म्हणून आतापर्यंत १३९६ भारतीय नागरिकांना सहा विमानांतून देशात परत आणण्यात आले असून, भारताने या महिन्यात यापूर्वी पहिली सूचनावली जारी केल्यापासून युक्रेनमधून बाहेर पडलेल्या भारतीयांची एकूण संख्या सुमारे ८००० झाली आहे. भारतीय विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यास आणि त्यांना परत आणण्यास सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले आहे.

नक्की पाहा हा व्हिडीओ >> Viral Video: युक्रेनच्या शेतकऱ्याकडून रशियन लष्कराचा टप्प्यात कार्यक्रम; ट्रॅक्टरला रणगाडा बांधला अन्…

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी मागील आठवड्यामध्ये युक्रेनविरोधातील युद्ध टाळता येणार नाही असं म्हणत युद्धाची घोषणा केल्यापासून लाखो लोक युक्रेन सोडून आजूबाजूच्या देशांमध्ये स्थलांतरित झालेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ukraine war pm modi calls up romania and slovak prime ministers requested for continued assistance in the next few days as well scsg