युक्रेनमध्ये सुरु असणाऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरामधून चिंता व्यक्त केली जात आहे. भारत, पाकिस्तान, चीनबरोबरच वेगवगेळ्या देशांमधील विद्यार्थी सध्या युक्रेनमध्ये अडकून पडलेत. तर दुसरीकडे युक्रेनमधून १० लाख लोकांनी स्थलांतर केलंय. जगभरामधून हे युद्ध आणि त्यामुळे होणारे मृत्यू तसेच आर्थिक नुकसानीबद्दल चिंता व्यक्त केली जात असतानाच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही या परिस्थितीबद्दल फेसबुक पोस्टच्या माध्यमातून भाष्य केलंय.

नक्की वाचा >> Ukraine War: पुतिन यांचा मोदींना कॉल, रशियाने केला धक्कादायक दावा; म्हणाले, “युक्रेननेच भारतीय…”

रोहित यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा थेट उल्लेख न करता त्यांच्या निर्णयांवर सूचक पद्धतीने भाष्य केलंय. “सध्याच्या परिस्थितीत आपल्याला रशियाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. जेव्हा एखादा देश एकाच व्यक्तीच्या विचाराने चालतो तेव्हा त्याचे गंभीर दुष्परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागतात आणि आपणच बरोबर आहोत असं त्या नेत्याला वाटतं तेव्हा त्याला थांबवणंही अवघड असतं,” असं रोहित यांनी म्हटलं आहे.

Shani Gocha 2024 saturn transit in kumbha Shani zodiac sign
शनी देणार बक्कळ पैसा; मूळ त्रिकोण राशीतील उपस्थिती ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना देणार पैसा, प्रतिष्ठा आणि भौतिक सुख
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Mahayuti, Shinde group leader,
महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता, शिंदे गटाच्या नेत्याचे भाकित
behavior, offensive, past, someone behavior,
माणसं अशी का वागतात?
pradnya daya pawar
‘भय’भूती: भित्यंतराचे कल्लोळ
Loksatta chaturang Friends friendship Express implicit relationship
माझी मैत्रीण: व्यक्त-अव्यक्त नातं
Why will families migrate from tiger protected areas
वाघांच्या संरक्षित क्षेत्रांतील कुटुंबांचे स्थलांतरण का होणार? समस्या काय? आव्हाने कोणती?
how to become a loco pilot training to become loco pilot
चौकट मोडताना : हळूहळू सकारात्मक होणारा समाजाचा दृष्टिकोन

नक्की वाचा >> Ukraine War: “भारत, पाकिस्तान, चीन सरकारने मॉस्कोवर…”; युक्रेन सरकारनं केलं आवाहन

“रशियाबाबत बोलायचं तर केवळ एका व्यक्तीच्या इगोमुळं संपूर्ण जगाला प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. आणि इगोने भरलेल्या अशा व्यक्तीने एखादा खेळ सुरू केला आणि त्यात त्याचा पराभव होत असला तरीही माघार न घेण्याची त्याची प्रवृत्ती असते. यामुळं संपूर्ण जग आज वेठीस धरलं गेलंय,” अशी टीका रोहित यांनी केलीय.

नक्की वाचा >> Ukraine War: “पंतप्रधान मोदी हिंमत दाखवून पुतिन यांना…”; भाजपा खासदाराने निशाणा साधत विचारला प्रश्न

“लोकशाही टिकवणं हे लोकांच्याच हाती असतं आणि लोकशाही चिरडण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर लोकांनीच पुढं येऊन ती वाचवण्याची गरज आहे. भारताबाबत विचार करताना आपल्याला संरक्षणावर खर्च करावाच लागेल पण आज महागाई आणि बेरोजगारीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केलं असताना मोठ्या प्रमाणात संरक्षणावर खर्च वळवणं आपल्यासारख्या देशाला परवडणार नाही. अन्यथा देशात अनेक अडचणी वाढू शकतात,” असं रोहित यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> Ukraine War: मोठी बातमी! पुतिन यांनी Nuclear Attack च्या भीतीने आपल्या कुटुंबियांना…

नक्की वाचा >> Ukraine War: पुतिन यांना मोठा धक्का! झेलेन्स्कींच्या हत्येसाठी पाठवलेल्या ‘चेचेन स्पेशल फोर्स’चा युक्रेनकडून खात्मा

“आज विकास सोडून सर्व प्रकारचं केवळ राजकारण होत असल्याचं दिसतं आणि याचा फटका सर्वसामान्य माणसाला सहन करावा लागतोय. त्यामुळं देशात सर्व राज्यांना विश्वासात घेऊन विकासाचा अजेंडा तयार करणं आणि कोणत्याही राज्याबाबत भेदभाव न करता तो राबवणं अधिक गरजेचं आहे,” असंही रोहित यांनी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना म्हटलंय.