रशियाने युक्रेनमध्ये लष्करी कारवाईची (Russia Military Operation in Ukraine) घोषणा केली आहे. आतापर्यंत राजधानी कीवसह ११ शहरांमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. अनेक ठिकाणी रशियाने क्रूझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ले केले आहेत. दरम्यान, युक्रेनच्या एका महिलेने धक्कादायक दावा केला आहे. या महिलेने म्हटले आहे की एक रशियन सैनिक तिला टिंडरवर फ्लर्टी संदेश पाठवत आहेत.
द सनच्या अहवालानुसार, युक्रेनमधील महिलांना आकर्षित करण्यासाठी आंद्रेई, अलेक्झांडर, ग्रेगरी आणि मायकेल यांच्यासह डझनभर रशियन सैनिकांनी डेटिंग अॅपवर प्रोफाइल तयार केले आहेत. दशा सिनेलनिकोवा नावाच्या महिलेने सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून अनेक रशियन सैनिक तिला टिंडरवर मेसेज आणि रिक्वेस्ट पाठवत आहेत.
World War I: का झाले पहिले महायुद्ध? जाणून घ्या या युद्धातील भारतीय सैन्याची भूमिका
३३ वर्षीय दशा सिनेलनिकोवा हिने ‘द सन’ला सांगितले, “मी कीव, युक्रेन येथे राहते, परंतु एका मित्राने मला सांगितले की टिंडरवर बरेच रशियन सैनिक आहेत म्हणून मी माझे स्थान सेटिंग बदलून खार्किव केले. तिथेही मला रशियन सैनिकांचे मेसेज येऊ लागले.”
या महिलेने काही स्क्रीनशॉट्स शेअर करत दावा केला आहे की रशियन सैनिक सोशल मीडियावर फ्लर्ट करण्याच्या उद्देशाने तिला मेसेज करत आहेत. अनेक सैनिकांनी त्यांच्या पदांचीही माहिती त्यांच्या छायाचित्रांसह तिला पाठवली आहे.
दशाने पुन्हा विचारले, “आम्हाला भेटण्याचा तुमचा काही विचार आहे का?” यावर आंद्रेईने उत्तर दिले, “मी आनंदाने येईन पण २०१४ पासून युक्रेनमध्ये रशियन लोकांचे स्वागत झाले नाही. यावर दशाने विचारले- “तुम्ही काय करता?” त्यावर आंद्रेईने कोणतेही सरळ उत्तर दिले नाही.
Russia Ukraine War: खनिज तेलाचे भाव १०० डॉलर प्रति बैरल पार
दशाने पुढे सांगितले, “पाठवलेल्या फोटोमध्ये रशियन सैनिक घट्ट पट्टेदार बनियानमध्ये दिसत होता. दुसऱ्या एका चित्रात तो माणूस बेडवर पिस्तुल घेऊन पडला होता. तथापि, मला त्यापैकी एकही आकर्षक वाटले नाही. मी कधीही शत्रूशी बोलण्याचा विचार करणार नाही. मी टिंडरवर त्याची विनंती नाकारली. पण मेसेज पाठवणारे असे अनेक होते.”