युक्रेन-रशिया युद्धाचा आज १४ वा दिवस आहे. गेल्या दोन आठवड्यांत रशियन हल्ल्यांमुळे अनेक युक्रेनियन लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, आतापर्यंत २० लाखांपेक्षा जास्त लोकांनी युक्रेन सोडून पलायन केल्याचं वृत्त आहे. दोन्ही देशादरम्यान चर्चा सुरू असून युद्धावर तोडगा निघालेला नाही. अशातच अमेरिकेने रशियन तेलाच्या आयातीवर निर्बंध घातले आहे. त्यामुळे तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. जगभरातील अनेक देशांनी निर्बंध लादल्यामुळे रशिया लगेच युद्ध थांबवण्याची चिन्हे कमी आहेत. अशातच युक्रेनमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन कधीही विजयी होणार नाही, असं वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी केलंय.
“रशियन हल्ल्यात जवळची लोक गमावलेल्या आणि संघर्षाला बळी पडलेल्या लोकांमध्ये रशियाविरुद्ध संताप वाढतोय. जगभरातही युक्रेनची दुर्दशा पाहून रशियाविरोधात लोकांचा संताप वाढतोय. व्हाईट हाऊसमध्ये पुतीनची खिल्ली उडवत बायडेन म्हणाले की, या युद्धाची रशियाला भयंकर मोठी किंमत मोजावी लागेल. तसेच युक्रेनमध्ये पुतिन यांच्यासाठी कधीच विजय नसेल.”
बायडेन म्हणाले की, “रशिया या युद्धामुळे आपली प्रगती नष्ट करतंय. त्यांना याची खूप मोठी आर्थिक किंमत देखील मोजावी लागत आहे. परंतु युद्ध कितीही सुरू राहिलं तरी युक्रेनमध्ये पुतिन कधीच विजयी होऊ शकणार नाही. पुतिन एखादे शहर ताब्यात घेण्यास सक्षम असतील, परंतु ते कधीही देश ताब्यात घेऊ शकणार नाहीत.”
अमेरिकेनं रशियन तेलाच्या आयातीवर घातली बंदी –
युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या रशियाला अमेरिकेने मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेने मंगळवारी रशियन तेलाच्या आयातीवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेच्या या निर्णयामागील सर्वात मोठे कारण रशियाच्या अर्थव्यवस्थेवर निर्बंध लादण्याचे आहे. कारण रशियाने युक्रेनविरुद्धच्या युद्धात अमेरिकेच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केले आहे. (रशिया-युक्रेन युद्धाच्या लाईव्ह घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.)
युक्रेन-रशिया युद्धाचा आज १४ वा दिवस आहे. गेल्या दोन आठवड्यांत रशियन हल्ल्यांमुळे अनेक युक्रेनियन लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, आतापर्यंत २० लाखांपेक्षा जास्त लोकांनी युक्रेन सोडून पलायन केल्याचं वृत्त आहे. दोन्ही देशादरम्यान चर्चा सुरू असून युद्धावर तोडगा निघालेला नाही. अशातच अमेरिकेने रशियन तेलावर निर्बंध घातले आहे. त्यामुळे तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. जगभरातील अनेक देशांनी निर्बंध लादल्यामुळे रशिया लगेच युद्ध थांबवण्याची चिन्हे कमी आहेत. अशातच युक्रेन हा पुतिन यांच्यासाठी कधीच विजय ठरणार नाही, असं वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी केलंय.
युक्रेन बॅकफूटवर; नेटोच्या सदस्यत्वाचा आग्रह सोडणार, रशियाची मागणी झेलेन्स्कींना मान्य
“रशियन हल्ल्यात जवळची लोक गमावलेल्या आणि संघर्षाला बळी पडलेल्या लोकांमध्ये रशियाविरुद्ध संताप वाढतोय. जगभरातही युक्रेनची दुर्दशा पाहून रशियाविरोधात लोकांचा संताप वाढतोय. या युद्धाची रशियाला भयंकर मोठी किंमत मोजावी लागेल. युक्रेन हा पुतिन यांच्यासाठी कधीच विजय ठरणार नाही,” असा टोला व्हाईट हाऊसमध्ये बोलताना बायडेन यांनी लगावला.
Ukraine War: पाकिस्तानी तरुणीने मानले पंतप्रधान मोदींचे आभार, कारण…
बायडेन म्हणाले की, “रशिया या युद्धामुळे आपली प्रगती नष्ट करतंय. त्यांना याची खूप मोठी आर्थिक किंमत देखील मोजावी लागत आहे. परंतु युद्ध कितीही सुरू राहिलं तरी युक्रेनमध्ये पुतिन कधीच विजयी होऊ शकणार नाही. पुतिन एखादे शहर ताब्यात घेण्यास सक्षम असतील, परंतु ते कधीही देश ताब्यात घेऊ शकणार नाहीत.”
अमेरिकेनं रशियन तेलाच्या आयातीवर घातली बंदी –
युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या रशियाला अमेरिकेने मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेने मंगळवारी रशियन तेलाच्या आयातीवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेच्या या निर्णयामागील सर्वात मोठे कारण रशियाच्या अर्थव्यवस्थेवर निर्बंध लादण्याचे आहे. कारण रशियाने युक्रेनविरुद्धच्या युद्धात अमेरिकेच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केले आहे.
पुतिन यांच्यावर अमेरिकेची मोठी कारवाई; रशियाच्या तेल आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून कच्च्या तेल आणि नैसर्गिक वायूची खरेदी बंद करणार असल्याची घोषणा ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज शेलने मंगळवारी केली. शेलने एका निवेदनात म्हटले आहे की ते रशियाकडून टप्प्याटप्प्याने सर्व हायड्रोकार्बन्स- कच्चे तेल, पेट्रोलियम उत्पादने, नैसर्गिक वायू आणि द्रवीभूत नैसर्गिक वायू खरेदी करणे थांबवणार आहेत.