रशियाने युक्रेनवर लादलेल्या युद्धामध्ये युक्रेनने रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांच्या एका मोठ्या योजनेला सुरुंग लावलाय. पुतिन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्क यांची हत्या करण्यासाठी युक्रेनमध्ये पाठवलेल्या चेचेन स्पेशल फोर्सचा खात्मा केलाय. युक्रेनमध्ये घुसखोरी करुन रशियाला थेट आव्हान देणाऱ्या वोलोडिमिर झेलेन्स्क यांच्या हत्येची जबाबदारी सोपवण्यात आलेली ही विशेष तुकडी युक्रेनने संपवल्याचं वृत्त डेली मेलने दिलंय.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: सैन्यासोबत युद्धग्रस्त देशात फिरणारा, पळून जाण्यास नकार देणार अन्…; लोक म्हणतात, “हाच युक्रेन युद्धाचा खरा हिरो”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मानवाधिकारांचे उल्लंघन करत शत्रूचा खात्मा करणारी आणि हिंसक तुकडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेचेन स्पेशल फोर्सचे ५६ टँक युक्रेनने उद्धवस्त केलेत. राजधानी किव्हजवळच्या होस्तोमीलमध्ये रशियन सैन्य आणि युक्रेनच्या लष्करामध्ये जोरदार संघर्ष सुरु आहे. या ठिकाणी रशिया हवाई हल्ले करत असून दुसरीकडून युक्रेन त्याला उत्तर देताना दिसतोय.

राजधानी किव्हजवळच्या याच संघर्षामध्ये युक्रेननं चेचेन स्पेशल फोर्सच्या ५६ तोफा नष्ट केल्यात. युक्रेनकडून करण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात रशियन लष्कराचं मोठं नुकसान झालं आहे. हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी चेचेन स्पेशल फोर्स युक्रेनमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या हत्येसाठी पाठवण्यात आलेली.

नक्की वाचा >> Ukraine War: शिवसेनेनं युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची मोदींशी केली तुलना, म्हणाले, “त्यांची छाती ५६ इंचाची तर जगाचे नेते मोदींनी…”

जगातील सर्वात मोठं विमान जळून खाक…
दरम्यान, याच प्रांतामध्ये म्हणजेच किव्हजवळच्या होस्तोमील विमानतळावर करण्यात आलेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये अंटोंनोव्ह-२२५ मिर्या हे युक्रेनच्या मालकीचं जगातील सर्वात मोठं कार्गो विमान जळून खाक झालं आहे.

“रशियन हल्लेखोरांनी युक्रेन हवाई क्षेत्रातील महत्वाचं आणि विशेष असं एएन-२२५ मिर्या विमान नष्ट केलंय. किव्हजवळच्या होस्टोमील एअरफिल्डवर हा सारा प्रकार घडलाय,” असं कंपनीने म्हटलंय. इतकच नाही तर विमान नष्ट झालं असलं तरी पुन्हा आम्ही ते निर्माण करु असा विश्वासही कंपनीने व्यक्त केलाय. “आम्ही पुन्हा या विमानाची बांधणी करु. आम्ही आमचं सशक्त, मुक्त आणि स्वतंत्र युक्रेनचं स्वप्न पूर्ण करु,” असंही कंपनीने म्हटलं आहे.

नक्की वाचा >> Ukraine War: “चला त्यांना नरकात…”; देशात घुसलेल्या रशियन सैन्याची दिशाभूल करण्यासाठी युक्रेन सरकारचं अनोखं आवाहन

युरोपीन महासंघ युक्रेनच्या मदतीला धावला…
दुसरीकडे रविवारी युरोपियन महासंघाने युक्रेनला मदत करण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. युरोपियन महासंघाच्या युरोपियन कमीशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डर लेयन यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे. युरोपीयन महासंघ पहिल्यांदाच एखाद्या देशाला शस्त्र खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत करणार आहे.

हल्ला करण्यात आलेल्या कोणत्याही देशाला अशाप्रकारे शस्त्र खरेदीसाठी युरोपीयन महासंघाने मदत करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ukraine wipes out bloodthirsty chechen special forces sent to assassinate zelensky scsg