रशियन सैन्याने युक्रेनमध्ये आक्रमण केलं असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जीव वाचवण्यासाठी नागरिक सुरक्षित ठिकाणी आश्रय घेत आहेत. मात्र एका वयस्कर दांपत्याने रशियन सैनिकांचा सामना करत त्यांना आपल्या घरातून हाकलून बाहेर काढल्याची एक घटना समोर आली आहे. हातात कोणतंही शस्त्र नसताना या दांपत्याने दाखवलेल्या धाडसाचं कौतुक होत असून त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दांपत्याने आपल्या घराबाहेर लावलेल्या कॅमेऱ्यात हा सगळा प्रकार कैद झाला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला असून नेटकरी कौतुक करत आहेत.

व्हिडीओमध्ये रशियन सैन्य युक्रेनमधील Voznesensk गावातील एका घरात शिरताना दिसत आहेत. तीन जवान आतमध्ये गेले असता एक जवान बाहेर वाट पाहत थांबला होता. यानंतर रशियन सैन्य तिथे कोणी युक्रेनच्या सैन्यातील आहे का याचा शोध घेत होते. पण यावेळी एक वयस्कर दांपत्य त्यांच्यासमोर येतं. यावेळी ते त्यांच्यावर ओरडतात आणि आपल्या जमिनीवरुन बाहेर पडण्यास सांगतात.

यावेळी एक जवान हवेत गोळीबार करत त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करतो. पण दांपत्य न घाबरता त्यांचा सामना करतं. तात्काळ आपला परिसर सोडा असं ते ठणकावून सांगतात.

त्यांच्यातील हा वाद बराच वेळ सुरु होता आणि अखेर रशियन सैनिक माघार घेतलं आणि तेथून बाहेर पडतं. दांपत्य रशियन सैनिक गेटच्या बाहेर गेल्यानतंर ते तिथे थांबले नाहीत याची खातरजमा करउन नंतर गेट बंद करतं.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी दांपत्याचं कौतुक करत आहेत.