रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आजचा पाचवा दिवस आहे. रशियाकडून युक्रेवरील हल्ले अद्याप जरी सुरू असले तरी याची गती आता कमी झाली असल्याचा दावा, युक्रेनच्या लष्कराकडून करण्यात आला आहे. एएफपी वृत्तसंस्थेनुसार, युक्रेनच्या लष्कराने म्हटले आहे की, रशियन सैन्याने आक्रमणाचा वेग कमी केला आहे. शिवाय, दोन्ही देशांमध्ये आज देखील चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आंतरराष्ट्रीय स्तरावर रशियाच्या आर्थिक कोंडीसाठी अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. शिवाय, आंतरराष्ट्रीय न्यायालयात युक्रेनने रशियन हल्ल्याविरोधात खटला देखील दाखल केला आहे.

युक्रेनविरुद्ध छेडलेल्या युद्धामुळे रशियामध्ये आर्थिक आणीबाणीसदृष परिस्थिती ओढवली असून, त्यावर तोडगा म्हणून रशियाच्या मध्यवर्ती बँकेने व्याजाचे दर ९.५ टक्क्यांवरून वाढवून थेट २० टक्के केले आहेत. रशियाचं रुबल हे चलन ऐतिहासिक नीचांकी पातळीवर गेले असून रशियानं निर्यातदार कंपन्यांना विदेशी चलन विकण्यास सज्ज राहण्यास सांगितले आहे. रॉयटर्सनं या संदर्भात वृत्त दिले आहे.

शिवाय, रशियावर बलाढ्य जागतिक शक्तींनी कठोर आर्थिक निर्बंध लादल्यानंतर, रशियाचा रूबल सोमवारी डॉलरच्या तुलनेत सुमारे ३० टक्क्यांनी घसरला, ब्लूमबर्ग न्यूजनुसार. US आणि EU ने काही रशियन बँकांना आंतरराष्ट्रीय बँक पेमेंट सिस्टम SWIFT मधून वगळण्याची योजना आखली आहे आणि व्लादिमीर पुतिन आणि परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांना वैयक्तिकरित्या लक्ष्य केले आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या हत्येचा रशियाचा कट उधळला!

दरम्यान, रशियाने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची हत्या करण्यासाठी युक्रेनमध्ये पाठवलेल्या चेचेन स्पेशल फोर्सचा युक्रेनच्या सैन्याने खात्मा केला आहे. झेलेन्स्की यांच्या हत्येची जबाबदारी सोपवण्यात आलेली ही विशेष तुकडी युक्रेनने संपवल्याचं वृत्त डेली मेलने दिलं आहे. मानवाधिकारांचे उल्लंघन करत शत्रूचा खात्मा करणारी आणि हिंसक तुकडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेचेन स्पेशल फोर्सचे ५६ टँक युक्रेनने उद्धवस्त केले आहेत. राजधानी किव्हजवळच्या होस्तोमीलमध्ये रशियन सैन्य आणि युक्रेनच्या लष्करामध्ये जोरदार संघर्ष सुरु आहे.

युक्रेनियन नागरिकांनी हाती उचलली शस्त्रे –

युक्रेनमध्ये १,९६,००० सक्रिय लष्करी कर्मचारी आहेत, तर व्लादिमीर पुतिन यांच्या रशियात सुमारे ९,००,००० सक्रिय लष्करी कर्मचारी आणि दोन दशलक्ष राखीव कर्मचारी आहेत. तरीसुद्धा, युक्रेनियन लोक हार मानण्यास नकार देत आहेत शस्त्रे उचलत आहेत, ते त्यांच्या ठिकाणांवर मोलोटोव्ह कॉकटेल बनवत आहेत. हे मोलोटोव्ह कॉकटेल म्हणजे कोणता खाण्यापिण्याचा पदार्थ नसून हे पेट्रोल बॉम्ब आहेत जे तुलनेने सहज बनवता येतात. काचेची बाटली ज्यामध्ये पेट्रोल किंवा अल्कोहोलसारखे कोणतेही ज्वलनशील पदार्थ लक्ष्यावर आग लावण्यासाठी वापरले जाते ते म्हणजे मोलोटोव्ह कॉकटेल.